Ganesh Festival : मंगलमय आनंदपर्वाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 September 2018

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात, डीजे व डॉल्बीला फाटा देत ढोल- ताशे, सनई, टाळ-मृदंग आणि लेझीमच्या गजरात जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी गणरायाचे आगमन झाले. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सकाळी नऊपासूनच मिरवणुकीद्वारे गणपती बाप्पाच्या मूर्ती आणत त्यांची प्रतिष्ठापना करण्यास सुरवात केली. दुपारी दीडपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याने त्यापूर्वी प्रतिष्ठापना करण्यास अनेक मंडळांनी प्राधान्य दिले. 

जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणांसह मंचर, चाकण, नारायणगाव, आळंदी, जेजुरी, भिगवण, वाघोली, लोणीकंद, घोडेगाव आदी मोठ्या गावांमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथे आधुनिक पद्धतीच्या सर्व वाद्यांना फाटा देत फक्त टाळ आणि मृदंगांच्या गजरातच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय आंबेगाव तालुक्‍यातील मेंगडेवाडी येथील पुरातन गणेश मंदिरात परंपरेनुसार कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अष्टविनायकांपैकी जुन्नर तालुक्‍यातील ओझर व लेण्याद्री येथील गणेश मंदिरांमध्ये गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ओझर येथील श्रींच्या जन्मोत्सवानिमित्ताने मंदिर व गाभारा परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. लेण्याद्री येथील श्रींच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ५० हजार भाविकांनी गिरिजात्मजाचे दर्शन घेतले.

सुमारे हजार गावांत ‘एक गणपती’
पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ८६५ गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. या सर्व गावांसाठी मिळून एक हजार ४०७ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतींचे मुख्यालये असलेल्या अनेक गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. सुमारे एक हजार गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival celebration in pune district