Ganesh festival : देखावे पाहण्याची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

पुणे - पावसाने सायंकाळी पुण्यनगरीत दमदार हजेरी लावली, तरीही गणेशभक्तांचा उत्साह दांडगा होता. तशातच मोहरमच्या सुटीमुळे बालगोपाळांना देखाव्यांचा मनसोक्त आनंद लुटता आला. रविवारी (ता. २३) गणेशोत्सवाची सांगता होणार असल्याने मध्यवर्ती भाग नागरिकांनी फुलून गेला होता. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यासहित पेठा-पेठांतील अंतर्गत रस्त्यांवर जिकडे तिकडे देखावे पाहण्याचा आनंद घेत रमत-गमत फिरणारे उत्साही गणेशभक्त  दिसत होते. 

गणेशोत्सवाचा गुरुवार हा आठवा दिवस होता. मंगळवार, बुधवारच्या तुलनेत आज भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. उद्या (ता. २१) देखावे पाहण्याचा अखेरचा दिवस असेल, कारण शनिवारी प्रत्येक मंडळाची विसर्जनाची तयारी आणि सत्यनारायणाच्या पूजेसहित विसर्जन रथ सजविण्यात कार्यकर्ते व्यग्र राहतील. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही गुरुवारचा दिवस अन्य मंडळांचे देखावे आणि श्रींचे दर्शन घेण्यासाठी निवडला होता. अप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौकासहित काही चौकांमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावले होते. पोलिस मित्रांसह मंडळांचे कार्यकर्तेदेखील पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सहकार्य करत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh festival Curiosity to see ganesh decoration