साडवली - परिसरात यंदाचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली होण्यावर भाविकांनी जोर दिला आहे. प्लास्टीक, थर्माकोल याला पूर्णपणे फाटा देवून पीओपी गणेशमूर्ती न आणता मातीची मूर्ती आणुन भाविकांनी चांगला संदेश दिला आहे.
साडवली - परिसरात यंदाचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली होण्यावर भाविकांनी जोर दिला आहे. प्लास्टीक, थर्माकोल याला पूर्णपणे फाटा देवून पीओपी गणेशमूर्ती न आणता मातीची मूर्ती आणुन भाविकांनी चांगला संदेश दिला आहे.
देवरुखनजिक आंबव शेवरेवाडी येथील भाविक विनय माने यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घरगुती गणेश सजावटीसाठी माती काम कलाकुसर करुन उत्सवाची शोभा वाढवली आहे. व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असणारे माने कुटुंबिय आंबव गावी येऊन गणेशोत्सव साजरा करतात. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी केलेली आरास लक्षवेधी ठरली आहे. त्यांचा आदर्श घेवून गावातही आता इकोफ्रेंडली सजावट होवू लागली आहे हे त्यांचे यश आहे.