Ganesh Festival : माहेर संस्थेत स्वच्छतेचा संदेश देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 सप्टेंबर 2018

रत्नागिरी -निवळी येथील माहेर संस्थेत स्वच्छतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. गेली दहा वर्षे हा उत्सव पर्यावरणपूरक रितीने साजरा होत आहे. यात प्रतिवर्षी नवा सामजिक संदेश या सणाच्या निमित्ताने दिला जातो. यंदा स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

माहेर संस्था अनाथ, निराधार मुली-मुले तसेच निराधार महिला-पुरुषांसाठी कार्यरत आहे. सध्या संस्थेत 35 मुले-मुली तसेच 60 महिला व पुरुष आहेत. या सर्व उपेक्षितांना जगण्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या संस्थेत विविध कार्यकम सण उत्सव साजरे केले जातात. संस्थेतील मुलांनी अधीक्षक सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुबक पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीसाठी मखर व सुरेख सजावट संस्थेतील प्रवेशितांनी केली.

उत्सव सात दिवस साजरा केला जाणार आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी आरती, प्रसाद याचबरोबर संस्थेतील प्रवेशितांसाठी दररोज एक वेगवेगळी स्पर्धा घेतली जात आहे. विजेत्यांना संध्याकाळी आरतीच्या वेळेस बक्षीस दिले जाते. गेली दहा वर्षे हा सण पर्यावरणास उपयुक्त असा तसेच समाजाला दिशा देणारा साजरा केला जात आहे. याकरिता अधीक्षक कांबळे, मीरा गायकवाड, अमित चव्हाण, आशीष मुळ्ये, शितल हिवराळे, विजया कांबळे, शिल्पा डांगे, अनुदेवी राजपुरोहित, फुलाबाई पवार, सीता मिश्रा, मार्था पॉल, जोसेफ दास व सर्व प्रवेशितांचे योगदान लाभत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Eco friendly Ganeshushav by Maher