पुणे - शहर, आपला परिसर स्वच्छ असावा, असे प्रत्येक पुणेकराला वाटतेच. त्यामुळेच गणेशोत्सवाचे औचित्य साधत सकाळ सोशल फाउंडेशन, सोनाटा गणेशोत्सव व पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गृहनिर्माण सोसायट्या व काही शाळांमध्ये १५ ते १६ सप्टेंबरदरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात पुणेकरांनाही सक्रिय सहभाग नोंदविता येईल.
शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील सभासद; तसेच शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सकाळ स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यासाठी पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करून देणार आहे.

ही मोहीम ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या विविध सामाजिक उपक्रमांच्या ‘सोशल फॉर ॲक्शन’ या मोहिमेचा एक भाग आहे. आपल्यालाही या मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येईल. त्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ वेबसाइटला, फेसबुकला लाइक करणे आवश्यक आहे.
स्वच्छता अभियान कधी व कोठे?
शनिवार (ता.१५) -
लुंकड अमेझॉन गृहनिर्माण सोसायटी, सीसीडी चौक, विमाननगर. (वेळ ः सकाळी ८ ते ९)
धनेश्वर हायस्कूल, धानोरी. (वेळ ः सकाळी ८ ते ९)
आनंद विद्यानिकेतन स्कूल, विमाननगर.
(वेळ - सकाळी ९ ते १०)
रविवार (ता. १६) -
पोलाइट पॅराडाइज, गोल्डन सिटी गृहनिर्माण सोसायटी, माधवनगर, धानोरी. (वेळ - सकाळी १० ते ११)
गुरू गणेश नगर गृहनिर्माण सोसायटी, डी. पी. रोड, कोथरूड. (वेळ ः सकाळी ८ ते १०)
वृंदावन गृहनिर्माण सोसायटी, डी. पी. रोड, कोथरूड
(वेळ - सकाळी ८ ते १०)