esakal | इको फ्रेंडली बांबूच्या मखरांना गणेशभक्तांची पसंती !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

इको फ्रेंडली बांबूच्या मखरांना गणेशभक्तांची पसंती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत : गणेशोत्सव (Ganesh Festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने भक्तांची मखर, गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. थर्माकोलच्या (thermocol) मखरऐवजी आता इको फ्रेंडली (Eco friendly) मखरांना (Decoration) भक्तांकडून अधिक मागणी वाढू लागली आहे. कर्जतमध्येही (Karjat) बांबूवर (bamboo) कलाकुसर करून आकर्षक मखर बनवले जात आहेत. त्याची किंमत अडीच हजार ते १५ हजारांपर्यंत आहे.

एखाद्या साध्या मंदिराप्रमाणे मखर बनवायचे असेल, तर संपूर्ण दिवस लागतो. मात्र, मागणीनुसार कलाकुशल वापरून बनवायचे असेल, तर कमीतकमी तीन दिवस लागतात. बांबूच्या मखर कमीत कमी चार ते पाच वर्षे टिकते. मखर बनवण्याचे काम गणेशोत्सवाच्या तीन महिने आधीपासूनच सुरू होते.

कर्जतमधील रवींद्र कांबरी हे सुद्धा बांबूपासून उत्कृष्ट आणि आकर्षक मखर बनवत असून, त्यांच्या या मखरांना वाढती मागणी आहे. कांबरी हे यापूर्वी थर्माकोलचे मखर बनवायचे; मात्र चार वर्षांपासून थर्माकोलच्या मखरवर बंदी आल्याने त्यांनी इको फ्रेंडली बांबूच्या मखर बनवण्यास सुरुवात केली. सध्या बाजारात बाबूंच्या मखरांना कमीत कमी अडीच हजार मोजावे लागते. तर मोठ्या आकाराच्या मखराची १५ हजारांपर्यंत विक्री होते.

बांबूचे मखर अष्टविनायक, षटकोनी मंदिर, सिंहासन, धनुष्य सिंहासन, आयक्रॉस मंदिर, काडी मंदिर, चौरस सिंहासन, टॉवर सिंहासन आदी विविध आकारातील मखर बांबूपासून बनवण्यात येतात.

बनवण्याची पद्धत बांबू एक वर्ष अगोदर तोडून बांधून ठेवावा लागतो. चांगल्या प्रकारे सुकल्यानंतर त्याला आकाराप्रमाणे सोलावा लागतो. त्यानंतर वेगवेगळ्या आकाराप्रमाणे त्याच्या पट्ट्या पाडल्या जातात आणि मग त्या गुंफून मखर बनली जाते.

loading image
go to top