विद्यार्थ्यांनी साकारले ‘इको गणपती’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

पुणे - पर्यावरणाचा होत जाणारा ऱ्हास व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आज दैनंदिन जीवनात दिसून येत आहे. हे सर्व टाळण्यासाठी सामाजिक प्रबोधन व्हावे, या हेतूने ‘सकाळ’च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. 

पुण्यातील स्ट्रोक्‍स फाउंडेशनचे चेतन पानसरे, स्नेहल कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. 

विमाननगर येथील फिनिक्‍स मार्केटसिटीचे संचालक अरुण अरोरा व पुणे सेंट्रल मॉलच्या मार्केटिंग व्यवस्थापक श्‍वेता वर्मा व अरुण रामानम, वेस्टएंड मॉलचे सीनियर मार्केटिंग मॅनेजर विराज सूर्यवंशी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सिटी वर्ल्ड स्कूल, मॅक्‍स फॅशन आणि क्‍लारा ग्लोबल स्कूल यांचे यासाठी सहकार्य लाभले.

आपली संस्कृती जपत सण-उत्सव साजरे करत असताना आपण पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही, याचेही भान ठेवायला हवे. ‘सकाळ’ने पुढाकार घेऊन सुरू केलेला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा हा उपक्रम नक्कीच नवी दिशा देणारा आहे. 
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याचे आमच्या शाळेचे तिसरे वर्ष आहे. ‘सकाळ’ने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभार.
- सारिका बाबर,  मुख्याध्यापिका, क्‍लारा ग्लोबल स्कूल

मुलांना सणांचे पारंपरिक महत्त्व शिकविण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
- सरोज खन्ना, संचालक, सिटी वर्ल्ड स्कूल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2018 Eco Friendly Ganpati Murti Child