बाप्पासाठी सोन्या-चांदीची आभुषणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

पिंपरी - अवघ्या तीन दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. लाडक्‍या बाप्पांच्या दागिन्यांची व्हरायटी सराफ पेढ्यांमध्ये दिसून येत आहे. घरच्या बाप्पासाठीदेखील चांदीचा मूषक, मोदक, मुकुट, जास्वंदाचे फूल, कमळ, केवडा खरेदी करण्यासाठी देखील अनेकांची पावले सराफी पेढ्यांकडे वळत आहेत. गणपतीसाठी पारंपरिक दागिन्यांबरोबर चांदीचे केळीचे घड, पेरू, सफरचंद आणि सोनचाफ्याला भाविकांकडून पसंती मिळत आहे. 

गणपतीसाठी दरवर्षी नवीन दागिने खरेदी करतात. गणपतीच्या दागिन्यात गौरी इतक्‍या व्हरायटी नसल्या तरी त्यामध्येही नावीन्य पाहायला मिळत आहे. त्यामध्ये किरीट, त्रिशूळ, परशू, माळा, तोडे, शेला या पारंपरिक दागिन्यांसह मोदक, पूजेचे साहित्य दूर्वा, फुले, काजू, बदाम या दागिन्यांना मोठी मागणी आहे. गणेशभक्त गणपतीसाठी चांदीतील मुकुट, मोदक हार, टिकलीहार, श्रीमंतहार, कडे, सोंडपट्टी, कमरपट्टा, तोडे, बाजूबंद, कंगन, कुंडल, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचे पान, मोदक प्लेट, जान्हवं, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टॅंड, फुलपरडी, फळपरडी, सोन्याचे पाणी दिलेले चांदीचे मोदक, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादीचा चांदीचा ड्रायफ्रूट सेट, सोन्याचे पाणी दिलेली फळं, कान, उंदीर, दगडूशेठ, सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा अशा चांदीच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. असे विविध प्रकारचे दागिने तसेच पूजेतील विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करताना दिसतात. एक मोदक, ११ मोदक, २१ मोदक यांचा सेट एव्हरग्रीन आहे. ज्यांना चांदीचेही दागिने शक्‍य नाहीत, पण गणपतीसमोर सजावट करण्याची इच्छा मात्र खूप आहे ते एक ग्रॅमच्या दागिन्यांचा मार्ग निवड आहेत. एक ग्रॅमचे दागिने घालून आपल्या घरच्या गणपतीची सजावट करतात. तसेच चांदीबरोबर सोन्याचे दागिने तयार करण्याकडे कल वाढला आहे. यंदा विणकाम केलेले चांदीचे केळीचे घडही ग्राहकांची पसंती आहे, अशी माहिती सराफांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2018 Jewellery Silver Gold