उकडीचे मोदक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 September 2018

साहित्य : दोन वाट्या तांदूळपिठी, दोन चमचे लोणी, चिमूटभर मीठ, पाणी.

सारण : चार वाट्या नारळचव, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, थोडे काजू, बेदाणे, एक चमचा वेलदोडे पूड, एक चमचा खसखस.

कृती : पातेलीत गूळ, नारळचव एकत्र शिजत ठेवावे. सारखे हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाले की उतरून ठेवावे. मिश्रण मऊ शिजवावे. थंड होण्यास ठेवावे. मोठ्या पातेलीत अडीच वाट्या पाणी, लोणी, मीठ घालून उकळण्यास ठेवावे. उकळत्या पाण्यात तांदूळपिठी घालून हलवावे. गुठळी राहू नये. उलथन्याच्या टोकाने हलवावे. गॅस बारीक करून झाकण टाकावे. एक वाफ येऊ द्यावी.

मोदकासाठी उकड तयार करावी. उकड थोडी थंड झाली की परातीत काढून तेलाचा हात लावून मळावी. उकड कोरडी वाटल्यास पाण्याचा हात लावून मळावी. लिंबाएवढा उकडीचा गोळा घेऊन पारी तयार करावी. त्यात सारणाचा गोळा घालून बंद करून मुखऱ्या पाडाव्यात. मुखऱ्या पाडण्यात कौशल्य असते.

कळीदार मोदक छान दिसतो. सर्व मोदक तयार करून पातेलीत पाणी घालून उकळावे. त्यावर पातळ कापड चाळणीत ठेवून मोदक उकडावेत. गरम मोदक साजूक तुपावर वाढावेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati prasad recipes in marathi