हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे गुरुजी तालीम मंडळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

जेव्हा गणपती मंडळाची स्थापना झाली होती तेव्हा या गणपती मंडळाची जबाबदारी पुण्यातील काही मुस्लिम समाजातील लोकांनी यशस्वीपणे पेलली.

आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील फुलांचा रथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य असते. शताब्दी महोत्सव झाल्यानंतर या मंडळाने वर्गणी घेणे बंद केले आहे. गेली 32 वर्ष हे मंडळ वर्गणी घेत नाही. ‘मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते स्वखर्चातून गणेशोत्सव साजरा करतात. वर्गणी बंद करणारे हे पहिले मंडळ आहे. सर्व सभासद झालेला खर्च समान वाटून घेतात. तसेच कार्यकर्ते किमान 101 रुपये वर्गणी देतात,’ अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी यांनी दिली. मानाच्या पाच गणपतींमध्ये गुरुजी तालीम गणपतीची एकमेव मिरवणूक ही फुलांची आरास करुन सजविलेली असते, तर इतर मानाचे गणपती हे पालखीतून येतात. 

हा गणपती आणि मंडळ हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. जेव्हा गणपती मंडळाची स्थापना झाली होती तेव्हा या गणपती मंडळाची जबाबदारी पुण्यातील काही मुस्लिम समाजातील लोकांनी यशस्वीपणे पेलली. त्यामुळे मानाच्या पाच गणपतींपैकी हा गणपती सर्वधर्मसमभाव जागृत करणारा आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, उपाध्यक्ष रविंद्र रक्षा हे आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guruji Talim Ganapati Mandal Pune