गुरुजी तालीम गणपतीची रुबाबदार बाप्पा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

हा गणपती विजय गणपती आहे. या स्वरुपाच्या गणपतीची उपासना केली तर तुम्हाला विजय प्राप्त होतो, अशा स्वरुपाचं हे ध्यान आहे.

पुण्यात तसे तालमींचे खुप गणपती आहेत. पहिलवानासारखे अंग असलेली मूर्ती या गणपतींची असते. अशीच गुरुजी तालीम गणपतीही मूर्ती आहे. उंदरावर बसलेल्या गुरुजी तालीम गणपतीची मूर्ती चतुर्भुज आहे. पद्मपुराणामध्ये गणपतीची 32 वर्णनं सांगितली आहे. त्यापैकी हा गणपती विजय गणपती आहे. या स्वरुपाच्या गणपतीची उपासना केली तर तुम्हाला विजय प्राप्त होतो, अशा स्वरुपाचं हे ध्यान आहे. या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे. 

2011 साली फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. गुरुजी तालीम गणपतीसाठी मंडळातील सभासद आणि कार्यकर्ते यांनी जमविलेल्या निधीतून दागिने तयार केलेले आहेत. याच दागिन्यांचा साज दरवर्षी चढविला जातो, असे मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी सांगतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idol Of Guruji Talim Ganapati Pune