चांदीच्या दागिन्यांची उलाढाल दहा कोटींची

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 August 2017

कोल्हापूर - गणेशोत्सवात नवस म्हणून मूर्तीला चांदीचे अलंकार वाहण्याची क्रेझ आता केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत पोचली आहे. त्यामुळेच आता उत्सवकाळात किमान दहा कोटी ३३ लाखांवर ही उलाढाल होण्याची शक्‍यता आहे. 

शहर आणि परिसरातील उपनगरांत लहान-मोठी सुमारे चौदाशे मोठी मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. त्यातील सव्वाशेहून अधिक मंडळांच्या मूर्ती चांदीच्या विविध अलंकारांनी आभूषित आहेत. 

या मूर्तींवर सरासरी किमान पंधरा ते वीस किलोचे अलंकार आहेत आणि प्रत्येक वर्षी मंडळांकडे भाविकांकडून किमान अर्धा ते पाऊण किलो चांदीचे दागिने अर्पण होतात. उर्वरित बहुतांश सार्वजनिक मंडळांकडेही 

शंभर ते तीनशे ग्रॅम चांदीचे अलंकार भाविकांतून अर्पण होतात. त्याशिवाय जिल्ह्यातील मोठ्या मंडळांची संख्या किमान तीन हजारांवर आहे. 

एकट्या शहरात कुटुंबांची संख्या दीड लाखावर आहे. त्याच तुलनेत जिल्ह्यातील कुटुंबांची संख्या सुमारे साडेआठ लाखांवर आहे. एकूण कुटुंबांपैकी किमान चाळीस टक्के कुटुंबांत म्हणजे गणेशमूर्ती प्रतिष्ठापना होते. कंठ्या, कड्या, तोडे, दुर्वा, दुर्वाहार, विविध प्रकारची फळे, ड्रायफ्रूट्‌स, लाडू, उंदीर, सोंडपट्टी, भिकबाळी, त्रिशूल, डमरू, विविध प्रकारच्या माळा आदी गणपतीच्या अलंकारांबरोबरच चांदीचे सजावटीचेही विविध साहित्य बाजारपेठेत उपलब्ध आहे. 

आकडे बोलतात...
शहरासह जिल्ह्यात साडेचार हजारांवर मोठी सार्वजनिक मंडळे
त्यापैकी किमान निम्म्या मंडळांकडे सरासरी किमान पाचशे ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण झाले असे गृहीत धरले तर किमान अकराशे पंचवीस किलो चांदीची उलाढाल शक्‍य
जिल्ह्यात किमान दहा लाखांहून अधिक कुटुंबं
त्यातील किमान चाळीस टक्के घरांत म्हणजेच सुमारे चार लाख घरांत मूर्ती प्रतिष्ठापना
त्यातील किमान वीस टक्के कुटुंबांत म्हणजे ऐंशी हजार कुटुंबांनी जरी सरासरी पाच ग्रॅम चांदीचे दागिने मूर्तीला अर्पण केले तरी चारशे किलो चांदीच्या दागिन्यांची उलाढाल शक्‍य
एकूण दागिन्यांची अंदाजे विक्री दोन हजार ६५० किलो
 यातून उलाढाल १० कोटी ३३ लाख ५० हजार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Silver Jewelry