#BappaMorya झगमगाटासाठी एलईडी माळा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 September 2018

पुणे - स्टार लाइट्‌सपासून ते कोल्हापुरी लाइट्‌सपर्यंत...मल्टीकलर लाइट्‌सपासून ते एलईडी डायमंड लाइट्‌सपर्यंत...अशा इलेक्‍ट्रॉनिक माळांच्या (लाइट्‌स) झगमगाटात घरोघरी बाप्पाचे स्वागत होणार आहे. घरगुती वा मंडळाच्या गणपती सजावटीसाठी यंदा विविधांगी इलेक्‍ट्रॉनिक माळा बाजारात आल्या आहेत. यात सर्वाधिक भाव खात आहेत त्या एलईडी माळा...

सजावटीसाठी दरवर्षी इलेक्‍ट्रॉनिक माळांना मागणी असते. चिनी बनावटीच्या माळांसह यंदा भारतीय पद्धतीच्या माळांनीही बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या सर्व माळा एलईडी प्रकारातील आहेत. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी २५ ते ३० फूट, तर मंडळांच्या डेकोरेशनसाठी ८० ते ११० फुटांच्या इलेक्‍ट्रॉनिक माळांची मागणी आहे. आपल्याला हव्या त्या रंगांमध्ये या माळा खरेदीसाठी उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या माळांची किंमत १५० ते १२०० रुपयांपर्यंत आहे. याबाबत व्यावसायिक हितेश ओसवाल म्हणाले, ‘‘दोन्ही प्रकारच्या माळा या एलईडी प्रकारातील आहेत. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी छोट्या चिनी माळा आणि मंडळांकडून भारतीय बनावटीच्या माळांना  मागणी आहे.’’

फोकस लाइटला सर्वाधिक मागणी
सजावटीसाठी यंदा एलईडी प्रकारातील फोकस लाइटला सर्वाधिक मागणी आहे. सिंगल कलर आणि मल्टिकलर लाइट्‌सची मागणी वाढली असून, झिरमिळ्यांसह फोकस लाइट्‌सही भाव खात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LED light for ganesh festival