पुणे - त्वष्टा कासार समाज संस्थेने साकारलेल्या महाबलीपुरम मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते झाले.
पुणे - त्वष्टा कासार समाज संस्थेने साकारलेल्या महाबलीपुरम मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते झाले.
त्वष्टा कासार समाज संस्थेचा यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सव असल्यामुळे संस्थेतर्फे गणेशोत्सवाला दोन दिवस अगोदर सुरवात करण्यात आली आहे. गणपतीची स्थापना सोमवारी झाल्यानंतर मंगळवारी चेन्नई येथील महाबलीपुरम मंदिराचा देखावा साकारला. हे मंदिर जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. या वेळी भव नृत्यालयातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, उपाध्यक्ष अजय तांबट, माजी नगरसेविका अनिता डाखवे, राधा पुरोहित मान्यवर उपस्थित होते.