दीड दिवसाच्या गणरायाला निरोप 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 September 2018

पिंपरी - "गणपती बाप्पा मोरयाऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ' अशी भावनिक साद घालून भाविकांनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. असे चित्र चिंचवड गावातील मोरया गोसावी, केशवनगर, थेरगाव यांसह पिंपरीतील झुलेलाल घाटावर शुक्रवारी (ता. 14) दिसून आले. 

गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे 26 ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वच घाटांवर जीवरक्षक तैनात असून, सुरक्षाव्यवस्था ठेवलेली आहे. चिंचवड येथील मोरया घाट परिसराला लोखंडी जाळी लावली आहे. घाटावर जाण्यासाठी केवळ एका ठिकाणी जागा ठेवली असून, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात आहेत. येथील मोरया गोसावी समाधी मंदिराजवळील पारावर संबळाच्या निनादात आरती करून भाविक मूर्ती विसर्जनासाठी घाटाकडे जात होते. त्यासाठी सहा बोटी ठेवलेल्या आहेत. या वर्षी महापालिकेने केशवनगर येथे पवना नदीवर घाट बांधला आहे. त्यामुळे मोरया घाटावर दरवर्षी होणारी गर्दी तुलनेने कमी होती. पिंपरीतील सुभाषनगर घाटावर विद्युत दिव्यांची व्यवस्था केलेली आहे. येथीही बोटींची व्यवस्था असून भाविकांना मूर्ती विसर्जन करणे सोयीचे झाले आहे. निगडी व आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांनी गणेश तलावात; तर रावेत येथील भाविकांनी बास्केट पुलाजवळील घाटावर मूर्तींचे विसर्जन केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one and half day ganesh visarjan in pimpri