#BappaMorya परगावच्या भक्तांनी लुटला देखावे पाहण्याचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 September 2018

पुणे - गौरी विसर्जन झाल्याने सोमवारी गणेशभक्तांनी शहरातील मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद सोमवारी घेतला. शनिवार, रविवारच्या तुलनेत सोमवारी गर्दी तुलनेने मर्यादित होती. पुणेकरांसह परगावाहून देखावे पाहण्यासाठी नागरिक आले होते.

शिवाजी रस्त्यावरून आणि लक्ष्मी रस्त्यावरून भाविकांची ये-जा रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी सुरू होती. मानाच्या पाच मंडळांसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट (सरदार विंचूरकरवाडा), जिलब्या मारुती मंडळ, निंबाळकर तालीम, होनाजी तरुण मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ, नेने घाट मित्र मंडळ यांसारख्या अनेक मंडळांचे देखावे पाहत त्या देखाव्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंगही नागरिक करत होते. 

देखावे पाहून दमलेले नागरिक हॉटेल्समध्ये भोजनाचा आस्वाद घेत होते. कुटुंबीयांसह अनेक नागरिक उपनगरांतूनही देखावे पाहण्यासाठी आले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: out of pune devotees Enjoy watching ganpati decoration