यंदा ‘स्वदेशी’चा झगमगाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पिंपरी - बहुतांशी व्यावसायिकांनी चिनी मालावर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याने पिंपरी चिंचवडकरांनी ‘इंडिया मेड’ विद्युत रोषणाई साहित्य खरेदीला प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सवात सजावटीच्या ‘चायना मेड’ वस्तूंपेक्षा ‘इंडिया मेड’ असलेल्या विविध प्रकारच्या लायटिंगच्या माळा, आकर्षक फोकस, लाइटची कृत्रिम फुले, लाइटच्या समई, एलईडी बसविलेली तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. परिणामी यंदाच्या गणेशोत्सवात भारतीय विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसेल. 

सध्या बाजारात विविध प्रकारच्या लायटिंग आणि सजावटीच्या इतर साहित्यापर्यंत चिनी माल उपलब्ध आहे. या मालाला प्रचंड मागणीही आहे; परंतु राष्ट्रभक्ती म्हणून विक्रेत्यांनी ‘इंडिया मेड’ सजावटीच्या वस्तू ठेवल्या आहेत. काही गणेश मंडळांनी चिनी मालावर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक कोंडी करण्यात खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतल्याचे जय गणेश इलेक्‍ट्रिकल्सचे विक्रेते रिकी कुकरेजा यांनी सांगितले. 

महागाईचा विचार करता रोषणाईमुळे विजेचे बिल कमी यावे, असे दिवे सध्या बाजारात आहेत. विविध प्रकारचे पण कमीतकमी वीज घेणारे दिवे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. रोषणाईला अधिक सुंदर बनविण्यासाठी फुले, पानांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीच्या साहित्यात माळा, लायटिंग, कृत्रिम फुलांच्या माळांना बाजारात अधिक मागणी आहे. यंदा एका वस्तूमागे १० टक्के दर कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोल्हापुरी वेणी ५० ते १०० फुटापर्यंत उपलब्ध आहे. लायटिंग माळा १०० ते १२५, कागदी व फुलांच्या माळा ६० ते १८०, फुले व कागदी माळा व सजावटीचे साहित्य ५० ते ४०० रुपयांचे पॅकेटनुसार उपलब्ध आहेत. लाइटच्या माळांमध्ये फुले, सोनेरी कागद आणि सजावटीचे साहित्य टाकून एकत्रित अशी माळदेखील बाजारात उपलब्ध झाली आहे. या प्रकारच्या माळांचे दर २०० पासून ते २५० रुपयांपर्यंत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news ganesh festival