
मागील दहा दिवसापासून गणेश भक्तांच्या घरी मुक्कामी आलेल्या गणरायाला रविवारी (ता. 23) निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शहर व जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विसर्जन घाटावर क्रेन, तराफे, जीवरक्षक, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा लक्ष ठेऊन राहणार आहे. शांतता बाधीत करणाऱ्यांच्या हालचालीवर पोलिस नजर ठेवून असल्याचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सांगितले.
नांदेड : मागील दहा दिवसापासून गणेश भक्तांच्या घरी मुक्कामी आलेल्या गणरायाला रविवारी (ता. 23) निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शहर व जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विसर्जन घाटावर क्रेन, तराफे, जीवरक्षक, सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा लक्ष ठेऊन राहणार आहे. शांतता बाधीत करणाऱ्यांच्या हालचालीवर पोलिस नजर ठेवून असल्याचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सांगितले.
गुन्हेगारांचा एक दिवस असला तर पुढचे वर्ष आमचे असते अशी तंबी देत गुन्हेगारांना जाधव यांनी कडक ईशारा दिला. शांतता बाधीत करणाऱ्या अनेकांना दोन दिवसासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसेच अडीच हजाराहून अधिक जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच 75 जणांचे हद्दीपारीचे प्रस्ताव अंतिम टप्यात असून गुन्हेगारांनी शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश मंडळांनी डीजे लावु नये, तसेच मिरवणूकीत दारु पीऊन सहभागी होऊ नये. शहराच्या शांततेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊन प्रशानाला सहकार्य करावे असा आवाहन संजय जाधव यांनी केले.
पोलिस बंदोबस्त
एक पोलिस अधिक्षक, एक अतिरिक्त पोलिस अधिक्षक, 13 पोलिस उपाधिक्षक, 43 पोलिस निरीक्षक, 145 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदार, तीन हजार कर्मचारी, एक हजार होमगार्ड, दोन राज्य राखीव पोलिस बलाच्या कंपन्या, जालना पीटीसीचे 75 पोलिस, एलसीबी, डीएसबी, आरसीपी प्लाटून, क्युआरटी प्लाटून, 20 विशेष पोलिस अधिकारी आणि वाहतुक शाखेचे कर्मचारी यांचा सहभाग आहे.
अशी केली तयारी
गणेश मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे महापालिकेच्या वतीने बुजविण्यात येत आहेत. तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती, सीसीटीव्ही सुरू करण्यात आले आहेत. मिरवणूकीला अडथळा ठरु नये म्हणून लोंबकळणारी वीजेची, टेलीफोन व केबलची तार तसेच एखाद्या झाडाची रस्त्यात आलेली फांदी तोडून रस्ता मोकळाकऱण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस अधिक्षक यांच्यासह सर्वच अधिनस्त अधिकारी तैणात करण्यात आले आहेत. घाटावर क्रेन, तराफ्यांची व ड्रोणची सोय करण्यात आली आहे.