पुणे - वाघोलीतील गणेशोत्सव दर्शन 

निलेश कांकरिया
Monday, 17 September 2018

वाघोली - वाघोलीतील गणेश मंडळांनी काल्पनिक महाल, फुलांची आरस, विद्युत रोषणाई यावर भर दिला असून, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

फडई चौकातील वाघेश्वर तरुण मंडळाने विद्युत रोषणाईतील महल उभारला असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी पुतळा चौकातील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबने शिवमहल उभारला आहे. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.  

बाजारतळ मैदान चौकातील शिवशक्ती तरुण मंडळाने बालाजी महल उभारला आहे. दर वर्षीची हलत्या देखाव्याची परंपरा मंडळाने यंदा मोडीत काढीत महल उभारला. केसनंद फाटा चौकातील अखिल शिवतेज मित्र मंडळाने साधी आरास करून संस्कृतीक व स्पर्धात्मक कार्यक्रमावर भर दिला. काळे ओढा परिसरातील शिवप्रेमी मित्र मंडळ व चिंतामणी युवा प्रतिष्ठानने साधी आरस करून विविध कार्यक्रमावर भर दिला आहे. सिद्धी पार्क परिसरातील सिद्धिविनायक मित्र मंडळाने विद्युत रोषणाई साकारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हनुमान चौकातील हनुमान तरुण मंडळाची अलंकाराने नटलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बाईफ रोडवरील सर्वोदय मित्र मंडळाने व अमर दीप मित्र मंडळाने स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  बाजारतळ मैदानजवळील श्रीमंत गणेश तरुण मंडळाने शिवभक्ती हा हलता देखावा उभारला आहे. संत तुकाराम महाराज मंदिर चौकातील गुरुदत्त मित्र मंडळाने फुलाची आरास केली आहे. आनंदनगर मधील चॅलेंज युथ संघाने विद्युत रोषणाई केली आहे. संत तुकाराम नगर मधील शिवराज मित्र मंडळाने व काळूबाई नगर मधील रोहिदास सातव मित्र मंडळाने साधी आरास करून विविध कार्यक्रमावर भर दिला आहे. विविध सोसायटी मध्ये गणेशोत्सवाला उधाण आले असून विविध कार्यक्रम घेतले जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune - Ganeshotsav Darshan in Wagholi