गणेशासमोर समाज प्रबोधनाचे धडे; देखाव्याच्या माध्यमातून संदेश 

अमित गवळे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मागील वर्षी गणेशोत्सवात संपुर्ण रायगड किल्ल्याची प्रतीकृती उभारून माहिती दिली होती. त्याद्वारे गड-किल्ले संवर्धनाचा संदेश दिला होता. यंदा सण उत्सव कसे साजरे करावेत, राष्ट्रिय एकात्मता याचा संदेश दिला आहे. या उपक्रमातून प्रभावी समाजप्रबोधन होत अाहे. 
- अक्षय अंकूश मनवी, सजावट करणारा युवक 

पाली : सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावातील अक्षय मनवी या युवकाने अापल्या घरगुती गणपतीच्या सजावटीतून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत. एरवी बाप्पासमोर सगळे जण काही ना काही मागण मागतात. परंतू इथे गणेशानेच अापल्याकडे अनेक गोष्टी मागितल्याचे दाखविले आहे. गणेशोत्सवात खेळले जाणारे जुगार, जबरस्ती घेतली जाणारी वर्गणी, डिजे, अंधश्रद्धा, बुवाबाबाच्या अाहारी जाणे अादी गोष्टी बंद करव्यात असे बाप्पाचे मागण अाहे. तर काय करायला पाहीजे याचा देखल चित्ररुपात संदेश देण्यात अाला आहे. 

या सजावटिच्या माध्यमातून गणपती उत्सव कशा प्रकारे साजरा करावा व करु नये हे अतिशय मार्मिकरित्या दाखविले आहे. देखाव्याच्या माध्यमातून समाजातील वाईट रितीरिवाज व परंपरांवर टिका करण्यात अाली अाहे. दिवसेंदिवस बोकाळत चाललेला भ्रष्टाचार, दहशतवाद व बलात्कार संपावा, वृद्धाश्रम बंद व्हावीत यासाठी काय केले पाहीजेत ते सांगण्यात अाले अाहे.

तर हिंदू-मुस्लिम कोपा नांदावा, माणसातील माणूसकी टिकुण रहावी या सर्व मागण्या मान्य असतील तरच मी (बाप्पा) तुम्हाला अाशिर्वाद देईन अशी अट घालण्यात आली अाहे. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अालेले लोक हे संदेश पाहून प्रेरित होत अाहेत. अनेकांना हा समाजोपयोगी उपक्रम खूप अावडला अाहे. 

मागील वर्षी गणेशोत्सवात संपुर्ण रायगड किल्ल्याची प्रतीकृती उभारून माहिती दिली होती. त्याद्वारे गड-किल्ले संवर्धनाचा संदेश दिला होता. यंदा सण उत्सव कसे साजरे करावेत, राष्ट्रिय एकात्मता याचा संदेश दिला आहे. या उपक्रमातून प्रभावी समाजप्रबोधन होत अाहे. 
- अक्षय अंकूश मनवी, सजावट करणारा युवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad news ganeshotsav in pali