esakal | सात हजार पोलिसांचा गणेशोत्सवात बंदोबस्त

बोलून बातमी शोधा

सात हजार पोलिसांचा गणेशोत्सवात बंदोबस्त
सात हजार पोलिसांचा गणेशोत्सवात बंदोबस्त
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे.

पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

शहरातील नोंदणीकृत गणेशोत्सव 
मंडळे - ३ हजार २४५ 
---------------------
असा असेल पोलिस बंदोबस्त...
अतिरिक्त पोलिस आयुक्त - २
पोलिस उपायुक्त - १५
सहायक पोलिस आयुक्त - ३६
पोलिस निरीक्षक - २००
सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक - ५२५
पोलिस शिपाई - ७ हजार

---------------------
बंदोबस्तासाठी अन्य तुकड्या
गृहरक्षक दल - ५००
राज्य राखीव पोलिस दल - ३ तुकड्या

---------------------
छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस पथक
चोरट्यांवर असेल विशेष लक्ष - साध्या वेशातील पोलिसांची पथके
बाँबशोधक पथक - मानाच्या गणपतीसह प्रमुख मंडळांच्या ठिकाणी होणार तपासणी, मेटल डिटेक्‍टर बसविणार
गर्दीची ठिकाणे - बेलबाग चौक, मंडई परिसर, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता यांसह सर्व गर्दीची ठिकाणे
---------------------

साडेबारा हजार सीसीटीव्ही कॅमेरे
मध्यवर्ती भाग, पेठांसह उपनगरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सर्व सीसीटीव्हीद्वारे पोलिस आयुक्तालयातील पोलिस नियंत्रण कक्षाद्वारे (कमांड सेंटर) लक्ष ठेवले जाणार आहे.
संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तूंबाबत इथे द्या माहिती - पोलिस नियंत्रण कक्ष - १००