गणेशोत्सव2019 :  पर्यावरण स्नेही शांति-शीला मित्र मंडळ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

एरंडवणा येथील शांती-शीला सोसायटीमधील सर्व सदस्य मिळून गणेशोत्सवाचा आनंद घेतात. शांती- शीला मित्र मंडळ या नावाने स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे.

पौडरस्ता (पुणे) -  एरंडवणा येथील शांती-शीला सोसायटीमधील सर्व सदस्य मिळून गणेशोत्सवाचा आनंद घेतात. शांती- शीला मित्र मंडळ या नावाने स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे. सोसायटीमधील क्लब हाऊस मध्ये कुंड्यामधील सुंदर रोपांच्या सहवासात स्थापित केलेली गणेशाची प्रसन्न मुर्ती सर्वांना प्रेरणा देणारी आहे. 

चित्रकला, पाककला, संगीत खुर्ची, फन फेर, फन गेम्स, क्रिकेट स्पर्धा, मुव्ही नाईट, वृक्षारोपण, बक्षिस वितरण समारंभ व वाद्यपथकाच्या साथीत करणार असलेले विसर्जन असा भरगच्च कार्यक्रम मंडळाने यावर्षी आयोजित केला आहे. श्रीराम चव्हाण, साईराज नेलगे, पार्थ पुरोहित हे युवक या वर्षी मंडळाच्या कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सोसायटीतील सर्व सदस्य एक प्रकारे एक मोठे कुटूंब बनले आहे. लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वच जण वेळेवर एकत्र येवून उपक्रम साजरे करतात. गेल्या वर्षी केरळ रिलीफ फंडासाठी मदत केली होती. यावर्षी सुध्दा पुरग्रस्तांना मदत करण्याचे नियोजन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shanti-sheela mitra mandal pune