- केवळ धार्मिक कार्यच नाही तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच कार्यात श्री कसबा पेठ गणपती मंडळ आघाडीवर असते. सर्व उपक्रमांतील महिलांचा सहभाग हे मंडळाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्सवामधील एका संपूर्ण दिवसाची जबाबदारी महिला सांभाळतात.
- उत्सवामध्ये महिलांना योग्य स्थान देण्यात पुढाकार घेतल्यानंतर विश्वस्तांमध्येही दोन महिलांना स्थान देण्यात आले आहे.
- 2017 साली नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी हे गाव मंडळाने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांसाठी पाण्याची टाकी बांधून देण्याप्रमाणेच त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी इतर सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
- पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय कोणताही डामडौल-भपका याशिवाय साधेपणाने उत्सव साजरे करणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ख्याती आहे.
- श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 126 वे वर्ष आहे. कसबा गणपतीच्या दर्शनास तत्कालिन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा, शंतनुराव किलरेस्कर अशा अनेक नामवंतांनी भेटी दिल्या आहेत.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:
These five things are special about kasba peth ganapati