Ganesh Festival : तिसरी पिढी सांभाळतेय क्रांतीविरांचा वसा

जितेंद्र सहारे 
Friday, 21 September 2018

चिमूर : देशात प्रथमतः तीन दिवस १९४२ मध्ये स्वांतत्र उपभोगणाऱ्या क्रांती नगरीच्या उत्साही तरुणांनी १९४० ला लोकमान्य टिळकांची प्रेरणा घेऊन श्रीहरी बाल विकास गणेश मंडळाद्वारे टिळक वार्डात गणेश उत्सव सुरू केला. या उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरू केले.

ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन केले होते . याच मंडळाचे काही सदस्य चिमूर क्रांती लढ्यात सक्रीय होते . अशा क्रांती विरांची तिसरी पिढी आजही त्यांचा गणेश उत्सवातून वसा चालवित आहेत. लोकमान्य टिळकांनी सामाजिक 'एेक्य, सलोखा, विचारांचे आदान-प्रदान व लोक जागृती करीता गणेश उत्सवाची सुरवात केली.

याचीच प्रेरणा घेऊन चिमूरातील उत्साही तरुण स्व.गणपतराव लांबे यांच्या नेतृत्वात निलकंठ लांबे , प्रभाकरराव जोशी , बाबुराव किटे , शंकरराव बोकारे यांच्या पुढाकारातुन  श्रीहरी बाल विकास गणेश मंडळ १९४० मध्ये स्थापन करून याद्वारे टिळक वार्डातील महादेव मंदीरापुढे ५ सप्टेबंरला गणेश उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली.

या उत्सवामध्ये जनजागृतीकरता विविध सामाजिक उपक्रम राबविल्या गेले ज्यातून राष्ट्रप्रेम, सामाजिक ऐक्याचा संदेश भजन कीर्तनाच्या माध्यमातून देण्यात आला. राष्ट्रसंतांनी आपल्या ओजस्वी वाणीतून युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची गणेश उत्सवात प्रेरणा निर्माण केली.

16 ऑगस्ट १९४२ च्या चिमूर स्वांतत्र सग्रामात गणपतराव लांबे, निलकंठ लांबे , बाबुराव कीटे आणी प्रभाकर जोशी यांनी सक्रीय सहभाग दिला होता .ज्यामुळे त्यांना कारावास आणी इंग्रजांचा जाचक छळ सहन करावा लागला . या क्रांती विरांणी दिलेला गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांचा वसा आज त्यांची तिसरी पीढी चालवित आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि विविध समाज जागृतीपर कार्यक्रमाची रेलचेल या गणेश उत्सवात असते . सध्या स्थीतीत स्थापत्यतज्ञ अमीत काशीकर यांच्या मार्गदर्शनात गणेश मंडळाचे अध्यक्ष सौरभ बडगे , उपाध्यक्ष वैभव नेऊलकर , सचिव अजिंक्य गायकवाड , संकेत मांडवकर , सुनिल किटे , पराग लांबे , बाळु बोकारे ,प्रफुल बोकारे , संजय बोकारे , आशीष शिरमध्ये , स्वप्नील काकडे , अभिजीत बोकारे , सोनु कावरे , प्रणय दांडेकर , प्रतिक दांडेकर , प्रविण काळे , राहुल लांबे व शहरातील इतर युवक कार्यरत आहेत .

गणेश विसर्जनाची पांरपारिक पद्धतीने रथातून मिरवणुक काढण्यात येते . या दरम्यान पारंपारीक वाद्द्याच्या तालात पताका मिरविल्या जाते, अनैसर्गिक रासायनिक गुलालामुळे त्वचा आणि डोळयांचे आजार होतात. म्हणून विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान मागील दहा वर्षांपासून गुलालाचा वापर केला जात नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third Generation Carry Historical Place