
Ganeshotsav 2022: गणपती बाप्पा करीता दिल्ली स्पेशल पनीर मोदक कसे तयार करायचे?
गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा पनीर मोदक.
गणेशोत्सव 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास दिल्ली स्पेशल पनीर मोदक तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे गणपती बाप्पा करीता दिल्ली स्पेशल पनीर मोदक कसे तयार करायचे?
साहित्य:
● दीड वाटी मावा
● पनीर आर्धी वाटी
● दोन वाट्या पिठीसाखर
● वेलायची पावडर
● थोडे केसर
● पाऊण वाटी किसलेले खोबरे
कृती:
मावा मंद आचेवर कोरडा होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा.पनीरला हाताने बारीक करा आणि केसर टाकून 2-3 मिनीट थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या.
आता पनीर थंड झाल्यास त्याल 2 चमचे साखर टाका. आणि छोटे-छोटे गोळे बनवा. थंड झालेल्या माव्यामध्ये वेलायची आणि साखर टाकून एकत्र करा. पनीर आणि माव्याचे सारखेच गोळे बनवा.
माव्याचा एक गोळा हातावर घेऊन त्याची वाटी बनवा आणि त्यात पनीरचे मिश्रण टाकून बंद करा.सर्व बनवलेल्या गोळ्यांना अशाप्रकारे मोदकांचा आकार द्या. प्लेटमध्ये सजवून बाप्पाला नैवेद्य दाखवा.