esakal | Ganesh Chaturthi 2021: असे बनवा Vegan मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

ganesha festival

Ganesh Chaturthi 2021: असे बनवा Vegan मोदक

sakal_logo
By
अर्चना बनगे

गणेशोत्सवात प्रत्येकाच्या घरी पहिला नैवद्य तयार होतो तो म्हणजे मोदक. हा पदार्थ बाप्पाला खुप आवडतो. म्हणून नैवद्याचा पहिला मान हा मोदकालाच दिला जातो. हा भारतीय पदार्थातील महत्वाचा गोड पदार्थ आहे. ज्यात किसलेला नारळ, गुळ असतो. मोदक तयार करत असताना विविध प्रकारचे मोदक केले जातात. गणेशाची आरती झाल्यावर हातावर प्रसाद येतो तो मोदकाचाच. मग तो उकडलेला असो की, तळलेले असो. गणेशोत्सवात पहिला प्रश्न पडतो तो, नैवद्याला मोदकात वेगळे काय करायचं. त्यात जर कोण वेगन असेल तर परत मग मोठा प्रश्न पडतो. पण आज आम्ही तुम्हाला खुप सोप्या टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊया Vegan पदार्थापासून हे पदार्थ कसे तयार करायचे.

पारंपारीक मोदक

सुरवातीला गरम तेलात कढईत किसलेला नारळ घालून २ मिनिटे शिजवा. नारळ शिजल्यावर त्यात थोडा गूळ घालून मिक्स करा. त्यानंतर थोडी वेलची पावडर सोबत बदामाचे दूध किंवा नारळाचे दूध घालून मिश्रण ५ मिनिटे हलवा. हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.

तांदळाचे पीठ तयार करण्यासाठी

उकळत्या पाण्यात थोडे तेल आणि मीठ घाला. आता यामध्ये हळूहळू पीठ घालून ढवळत राहा. हे करत असताना पीठाच्या गाठी तयार होणार माहीत याची काळजी घ्या.मिश्रण तयार झाल्यावर मोदक वळा आणि ते उकडून घ्या.

चाॅकलेट मोदक

वेगन डार्क चाॅकलेट किसून घ्या.त्यानंतर ते मायक्रोव्हेवमध्ये वितळवा. मोदक साच्याला थोडे तेल लावून त्यात वितळलेले चाॅकलेट घाला. यात बदाम, काजू,क्रॅबनेरी घाला.आता ४ते ५ तास फ्रिजरला लावा.

पीनर बटर मोदक

Vegan शेंगदाण्याचे बटर वितळून त्यात थोडे तेल घाला. व्हॅनिला इसेन्स, बदाम घालून मिक्स करा.त्यात साखर घालून मोदकाच्या साच्यात घाला.एका तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. तुमचे पीनर बटर मोदक खाण्यासाठी तयार.

नियमीत Vegan खाण्याचे असे आहेत फायदे

- Vegan खाण्यांने वजन कमी होण्यास मदत होते.

-मधुमेह कमी होण्यास मदत होते.

-कर्करोग आणि इतर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

-जीवनसत्व आणि पोषक तत्वांमुळे समतोल राखून निरोगी जीवन जगण्यास मदत होते.

loading image
go to top