esakal | चुरम्याचे लाडू करा आणि बाप्पाला खूश करा | Churma Laddu Recipe
sakal

बोलून बातमी शोधा

Churma laadu recipe

गणपती घरी आले की घरात खाण्यापिण्याची चंगळ ऐरवीपेक्षा जरा जास्तच असते, नाही का! गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नवनवीन प्रसाद कोणता बनवावा याची लिस्ट तर काहीजण आधीच बनवून ठेवतात. पण तुमच्या या लिस्टमध्ये हा प्रसादाचा पदार्थ आहे का? अहो नसेल तर लगेच शामिल करा. गणपती बाप्पाला खुश करायचं आहे ना.. मग या पदार्थांची रेसिपी खास गणेशोत्सव निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

चुरम्याचे लाडू करा आणि बाप्पाला खूश करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सवात तुम्ही बाप्पाला आवडणाऱ्या मोदकासह वेगवेगळ्या पदार्थ करू शकता. यामध्ये चुरमा लाडूसुद्धा तुम्ही बाप्पाला नैवद्य म्हणून दाखवू शकता.

2 मोठी वाटी गव्हाच्या जाडसर पीठात अर्धा कप तूपाचे मोहन घालून मिक्स करा. त्यात अर्धा कप पाणी टाका आणि मिश्रण मळून घ्या. हे मिश्रण छाकून अर्धा तास ठेवा. मळलेल्या पीठाची हाताने मुठीया (लांबट गोळे) बनवा. कढईत तेल गरम करा. त्यात मुठीया तळून घ्या. गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मुठीया तळून घ्या आणि एक ते दिड तास थंड व्हायला ठेउन द्या. त्यानंतर मुठीयाचे हातानेच लहान लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सर मधून पावडर होईपर्यंत बारीक करा. ही बारीक मुठीया पावडर बाजूला ठेवा.

गॅसवर एका पॅनमध्ये कमी आचेवर 2 चमचा तूप, त्यात दिड कप बारीक केलेला गुळ टाकून मिक्स करत रहा. गुळाला विरघळू द्या, शिजवू नका. आच बंद करुन अर्धा चमला विलायची पूड त्यात टाका. एक चिमूट जायफळ पावडरही मिक्स करा. आता बारीक मुठीया पावडरमध्ये गुळाचे मिश्रण, नारळाचा कीस 2 चमचे, ड्रायफ्रुट्स, अर्धा चमचा खसखस टाकून मिक्स करा. 3-4 मिनिटासाठी थंड व्हायला हे मिश्रण ठेवा. पुन्हा हाताने मिक्स करा आणि लाडू बांधा. चुरमा लाडू तयार.

loading image
go to top