बाप्पाचे आवडते मोदक कसे बनवतात? जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 August 2019

गणेशोत्सवजवळ आलाय... आपल्या बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक करायचे आहेत.. जाणून घ्या सोपी पद्धत... 

गणेशोत्सवजवळ आलाय... आपल्या बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक करायचे आहेत.. जाणून घ्या सोपी पद्धत... 

साहित्य : दोन वाट्या तांदूळपिठी, दोन चमचे लोणी, चिमूटभर मीठ, पाणी.

सारण : चार वाट्या नारळचव, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, थोडे काजू, बेदाणे, एक चमचा वेलदोडे पूड, एक चमचा खसखस.

कृती : पातेलीत गूळ, नारळचव एकत्र शिजत ठेवावे. सारखे हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाले की उतरून ठेवावे. मिश्रण मऊ शिजवावे. थंड होण्यास ठेवावे. मोठ्या पातेलीत अडीच वाट्या पाणी, लोणी, मीठ घालून उकळण्यास ठेवावे. उकळत्या पाण्यात तांदूळपिठी घालून हलवावे. गुठळी राहू नये. उलथन्याच्या टोकाने हलवावे. गॅस बारीक करून झाकण टाकावे. एक वाफ येऊ द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recipe of Ukadiche Modak on Ganesh Festival