राजर्षी शाहू प्रतिष्ठान : तरुणांची व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019


सकाळच्या ऑनलाईन ढोल-ताशा स्पर्धेत पुण्यातली पथके सहभागी झाली आहे. ही पथके केवळ वादनापुरती मर्यादित नाहीत. या पथकांचे सामाजिक कामही मोठे आहे. आपापल्या परीने ही मंडळी विविध सामाजिक कामांत कार्यरत असतात. या सहभागी पथकांची माहिती येथे देत आहोत. सोबत त्यांच्या वादनाच्या फेसबूक पोस्टची लिंकही आहे. आपण या लिंकवर जाऊन या पथकांचे वादन ऐका आणि त्यांना लाईक, शेअर, कॉमेंट करुन दादही द्या....
 

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील ( सोमवार, मंगळवार, रास्ता पेठ) फक्त मुलांचे असणारे राजर्षी शाहू प्रतिष्ठान हे ढोल ताशा पथक त्याच्या वादन बरोबरच इतर सामाजिक उपक्रम राबवते. शिबिरे, व्याख्यान माला, सामाजिक संस्थांना मदत विविध उपक्रमांच्या सादरीकरणाने ह्या परिसरातील सामाजिक समीकरण बदलणारे ठरले आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. पथकांच्या माध्यमातून अनेक तरुणांची व्यसनाधीनता कमी करण्यात आम्हाला यश मिळाले आहे, हे आम्ही अभिमानाने नमूद करू इच्छितो.

गेल्या १६ वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुणवत्तापूर्ण वादन करणारे आमचे पथक हे सुमारे १२० (फक्त) मुलांचे पथक आहे. मोरया, शिवतांडव ह्यांसारख्या स्वनिर्मित तालांबरोबरच पारंपरिक ढोल ताशांच्या इतर तालांचे देखील पथक गणेशोत्सवात शास्त्रशुद्ध पद्धतीने वादन करते. मिरवणुकीसाठी फक्त मानांच्या गणपतींच्या मागे न लागता छोटया आणि मोठ्या अशा मंडळांना हे पथक प्राधान्य देते जेणेकरून शास्त्रशुद्ध वादन फक्त ठराविक मंडळांशी संबंधित राहू नये.!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajarshi Shahu Foundation Participate in Sakal Dhol tasha competition