Ganesh Visarjan 2021: कोल्हापुरात गणेश मंडळांकडून शिस्तीचे पालन

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ठरलेल्या वेळेत शिस्तबद्धपणे मंडळांकडून मूर्ती विसर्जन .
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ठरलेल्या वेळेत शिस्तबद्धपणे मंडळांकडून मूर्ती विसर्जन .

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश मंडळांनी बाप्पांना साधे पणानेच निरोप दिला. मास्क लावलेले मोजके कार्यकर्ते, टाळ्या आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि ठरलेल्या वेळेत शिस्तबद्धपणे मंडळांकडून मूर्ती विसर्जन केल्या जात होत्या. पोलिसांनी विसर्जन मार्ग, महत्वाचे चौक आणि इराणी खण यावर कडक बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ वादाचे अपवाद वगळता सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सुरळीत सुरू होते.

दरवर्षी थाटात निघणारी विसर्जन मिरवणूक आणि प्रबोधन करणारे जिवंत देखावे हे कोल्हापुरच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे विसर्जन मिरवणूकांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यातही पोलिसांनी विसर्जन मार्गातही बदल केले आहेत. त्यामुळे मंडळांनी जवळच्या पर्यायी मार्गाने इराणीकडे जाणे पसंत केले. संपूर्ण विसर्जन मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाद्वाररोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. येथेही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मिरवणुक मार्गावर भाविकही जागोजागी बप्पांना निरोप देण्यासाठी थांबून होते. येथेही गर्दी होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. गणेश मंडळांकडूनही शिस्तीचे पालन केले जात होते. शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, रंकाळा टॉवर, गंगावेश अशा मुख्य चौकात पोलिस मोठ्या संख्येने तैनात होते.

Summary

संपूर्ण विसर्जन मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाद्वाररोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

इराणी खणीकडे जाणारे सर्व मार्ग बंद...

इराणी खणीकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी शनिवारी रात्रीच बॅरेकडस् लावून बंद करण्यात आले होते. तांबट कमान, देवकर पाणंद, हरीओमनगर याठिकाणी पोलिस होमगार्ड आज सकाळ पासून बंदोबस्त बजावत होते. गणेश मंडळाची फक्त मूर्ती व मोजकेच कार्यकर्ते पुढे सोडण्यात येत होते. तसेच इराणी खणीजवळ वाहन चालकासह फक्त पाचच कार्यकर्ते आत सोडण्यात येत होते. त्यांना मास्क लावण्याच्या सूचनाही पोलिसांकडून वारंवार देण्यात येत होत्या.

सीसी टीव्हीवरून इराणी खणीवर वॉच

इराणी खणीच्या प्रवेशाच्या ठिकाणी आणि आतील बाजूस दोन मंडप उभारण्यात आले आहेत. तेथून पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील व उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्याकडून सीसी टीव्हीद्वारे सर्वत्र वॉच ठेवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात होत्या.

खणीला पोलिस छावणीचे स्वरूप

इराणी खणीवर चारीही बाजूने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जलदकृती दलाच्या तुकड्याही येथे तैनात करण्यात आल्या आहेत. व्हाईट आर्मी, जीवनज्योतीसह स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते येथे प्रशासनाच्या मदतीला उपस्थित आहे. त्यामुळे खणीला जणू पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com