मुकेश अंबानी नवव्यांदा सर्वांत श्रीमंत भारतीय

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

सिंगापूर- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. तब्बल 22.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अंबानी हे नवव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

सिंगापूर- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. तब्बल 22.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अंबानी हे नवव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

फोर्ब्ज मासिकाने भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अनिल अंबानी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून, त्यांच्यापाठोपाठ सन फार्माचे दिलीप शांघवी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. परंतु, सन फार्माच्या शेअरमधील घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलरची घट झाली आहे. यंदा शांघवी यांची संपत्ती एकुण 16.9 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याशिवाय, हिंदुजा कुटुंबाने 15.2 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी हे एक क्रमांकाने खाली जात चौथ्या क्रमांकावर आले आहेत. प्रेमजी यांची एकुण संपत्ती यावर्षी 15 अब्ज डॉलरएवढी झाली आहे. विशेष म्हणजे, पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांनादेखील यादीत 48व्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे. बाळकृष्ण यांच्याकडे एकुण 2.5 अब्ज डॉलरची संपत्ती उघड असल्याचे जाहीर झाले आहे.

मुकेश अंबानींची एकुण संपत्ती वर्षभरात 18.9 अब्ज डॉलरवरुन 22.7 अब्ज डॉलरएवढी झाली आहे. त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या संपत्तीचा आकडा 3.4 अब्ज डॉलरएवढा असून, श्रीमंतांच्या यादीत ते 32 व्या क्रमांकावर आहेत. गेल्यावर्षी ते 29 व्या क्रमांकावर होते. भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंतांकडे एकुण 381 अब्ज डॉलर अर्थात 25.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.

Web Title: Mukesh Ambani India's richest for 9th year

टॅग्स