200 रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार औरंगाबादेत!

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- 30 वर्षांपूर्वी घेतले होते पैसे

- भारत दौऱ्यावर आले असताना केले पैसे परत.

औरंगाबाद : आपण इतरांकडून अनेकदा उधारीवर पैसे घेतो. मात्र, घेतलेले पैसे अनेकदा परत करण्याचे विसरतो. पण कोणी परदेशातून येऊन उधारी देईल का? तर उत्तर नाही असेच येईल. मात्र, केनियातील एका व्यक्तीने 30 वर्षांपूर्वी घेतलेले 200 रुपये परत केले. ही व्यक्ती साधीसुधी नसून आहे खासदार. तेही केनिया देशातील.

रिचर्ड टोंगी असे केनियातील खासदाराचे नाव आहे. 30 वर्षांपूर्वी ते औरंगाबाद येथे काही वर्षे राहून व्यवस्थापनाचे शिक्षण घेत होते. त्यादरम्यान स्थानिक दुकानदार काशीनाथ गवळी यांनी रिचर्ड यांना 200 रुपयांची मदत केली होती. रिचर्ड हे केनियातील एका शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले. तेव्हा रिचर्ड यांना उधारीची परतफेड करण्याची संधी मिळाली. त्यांनी घेतलेले पैसे गवळी यांना परत केले. 

दरम्यान, रिचर्ड यांनी घेतलेले उधारीचे पैसे परत करत गवळी कुटुंबीयांची भेट घेतल्यामुळे काशीनाथ गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत आनंद झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 years later Kenya MP returns to repay college debt of Rs 200 to Aurangabad grocer