मुंबईतील वाहतूक सिंगल तिकीटवर आणणार: मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

न्युयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे निर्माण होत असलेले प्रचंड जाळे, त्यात एकात्मिक दृष्टिकोन आणि ही संपूर्ण प्रणाली सिंगल तिकिटींगवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. न्यूयॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि फ्रेंडस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित एका समारंभात मुख्यमंत्र्यांनी मराठीतून संवाद साधता. 

<

>

मुख्यमंत्री म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून पनवेलपर्यंत आणि चर्चगेटपासून विरारपर्यंतच्या दोन्ही कॉरीडॉरवर इलिमेंन्टेड कॉरीडॉर तयार करत आहोत. या समर्पन ट्रेनची वाहतूक क्षमता दुप्पट असणार आहे. मान्सुन संपल्यानंतर इस्ट कोस्टला रुरो सर्वीस सुरू करत आहोत. यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मोठ्या गाड्या रुरोमध्ये टाकता येतील. यातून नवी मुंबई, कोकणाकडे जाणे सोपे होणार असून, 120 किमीचे अंतर केवळ 30 मिनीटात पुर्ण करता येऊ शकेल. यासाठी अमेरीकेतील न्युयॉर्कसारख्या काही शहरांप्रमाणे सिंगल तिकीट प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे एकाच तिकीटावर मेट्रो, मोनो, बस, वॉटर ट्रान्सपोर्टद्वारे फिरता येणार आहे."

<

>

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाचीही प्रशंसा केली. "मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भारतात मुलभूत परिवर्तन होत आहे. इन्फ्रास्टक्चर तयार करताना पायाभूत सुविधांचा विकास करणे या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. या मुलभूत सुविधांमुळेच देशातील 30 कोटी लोकांना बॅंक व बॅंक खाते काय असते हे समजले. ही भारतातीलच नव्हे तर जगातील मोठी क्रांती आहे. आज देशातील 7 कोटी कुटुंबांना शौचलये, 1 कोटी कुटुंबांना घरे, 5 कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन, कोट्यावधी लोकांच्या गावात विज पोहचली आहे. आज देशातील एकही गाव असे नाही जिथे विज पोहचली नसेल. आणि पुढली वर्षापर्यंत एकही घर बिना विज पोहचल्याचे राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले." 

Web Title: Chief Minister will bring traffic in Mumbai on single ticket