'जोकर' फेम अभिनेता फिनिक्सच्या गाडीचा अपघात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सध्या जगभरातील बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'जोकर' या चित्रपटातील मुख्य  अभिनेता वाकीन फिनिक्स याच्या गाडीचा अमेरिकेतील लॉस एंजेलेस येथे अपघात झाला आहे

लॅास एंजेलेस : सध्या जगभरातील बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'जोकर' या चित्रपटातील मुख्य  अभिनेता वाकीन फिनिक्स याच्या गाडीचा अमेरिकेतील लॉस एंजेलेस येथे अपघात झाला आहे. दरम्यान या तो सुखरूप असून त्याच्या गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अभिनेता वाकीन फिनिक्स हे लॅास एंजिलस येथे पार्किंगमधून आपली गाडी काढत असताना त्याच्या गाडीने अग्निशमन विभागाच्या गाडीला जोरदार टक्कर दिल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान गाडी जास्त वेगात नसल्याने फिनिक्स हे सुखरूप आहेत. 

जगभरासह भारतातही जोकरची 'सुपरहिट'

'जोकर' चित्रपटात जोकरची भूमिका साकरणारा अभिनेता वाकीन फिनिक्स याने आपल्या दमदार अभिनयामुळे जोकर हे पात्र आणि चित्रपट केवल हॅालिवुडमध्येच नाही, तर संपूर्ण जगात हीट केला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांत या चित्रपटातील फिनिक्स याच्या अभिनयाला अॅास्करने सन्मानित केले जाईल अशी चर्चा देखील सुरू आहे. भारतात देखील 450 स्क्रिनवर 'अ' सर्टिर्फिकेटसोबत रिलीज होऊन देखील जोकरने चांगलीच कमाई केली आहे. आतपर्यंत ही कमाई 50 कोटीच्या घरात गेली असून पहिल्याच दिवशी जगभरात या चित्रपटाने 5 कोटीचा गल्ला केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Joker' fame actor Phoenix's car accident