esakal | मेक्सिकोत नव्या संस्कृतीचा शोध? तब्बल 15 हजार वर्षांपूर्वीचे अवशेष लागले हाती...

बोलून बातमी शोधा

mammoth

क्सिको शहरातील नव्या विमानतळाच्या खोदकामावेळी पुरातत्व विभागाला तब्बल 15 हजार वर्ष जुने महाकाय हत्तीचे सांगाडे हाती लागले आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 60 महाकाय हत्तींचे सांगाडे सापडल्याने प्रागैतिहासिक काळात परिसरात महाकाय हत्तींची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेक्सिकोत नव्या संस्कृतीचा शोध? तब्बल 15 हजार वर्षांपूर्वीचे अवशेष लागले हाती...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेक्सिको ः मेक्सिको शहरातील नव्या विमानतळाच्या खोदकामावेळी पुरातत्व विभागाला तब्बल 15 हजार वर्ष जुने महाकाय हत्तीचे सांगाडे हाती लागले आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 60 महाकाय हत्तींचे सांगाडे सापडल्याने प्रागैतिहासिक काळात परिसरात महाकाय हत्तींची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रमाणे परिसरात नव्या संस्कृतीचा शोध लागतो का, त्याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅन्थ्रॉपॉलॉजी अॅण्ड हिस्ट्री (आयएनएएच) या संस्थेचे शास्त्रज्ञ शोध घेत आहे. 

मोठी बातमी ः Coronavirus : फक्त 2 मीटरचं सोशल डिस्टन्सिंग नाही तर वाऱ्याचा वेगही महत्वाचा, अमेरिकन संस्थेचा अहवाल

गेल्या डिसेंबर महिन्यात आयएनएएच संस्थेला जुन्या सान्ता ल्युसिया एअर बेस (लष्करी विमानतळ - ज्याचे रुपांतर आता मोठ्या विमानतळात करण्याचे काम सुरु आहे) परिसरात प्राण्याचे लहान-मोठे हाडे सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विमानतळाच्या नियंत्रण टॉवर बांधण्यासाठी खोदकाम करताना मोठ-मोठी हस्तिदंत आणि हाडे सापडू लागली. त्याबाबत आयएनएएच संस्थेला माहिती दिल्यानंतर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने खोदकाम करून जवळपास 60 महाकाय हत्तींचे अवशेष शोधून काढले.

कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

आयएनएएचच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी हा परिसर मॅक्सिकन खोऱ्याचा आणि पूर्व कोलंबियन संस्कृतीचा भाग असलेल्या झाल्टोकॅन तलावात बुडाला होता. कालांतराने तलाव कोरडा पडल्यानंतर परिसरात महाकाय हत्तींच्या शिकारीसाठी लावलेले सापळेही आमच्या हाती लागले आहे. त्यानुसार या परिसरात महाकाय हत्तींची शिकार केल्याने त्यांचे अनेक सांगाडे सापडत आहे. विशेष म्हणजे ही सर्व सांगाडे कोलंबियन महाकाय हत्तींच्या प्रवर्गातील असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या खोदकामात बायसन, उंट तसेच घोड्यांसह माणसांचेही हाडाचे अवशेष सापडले आहे.

मोठी बातमी ः कोरोना नियंत्रणासाठी पालिका आयुक्तांचा पुढाकार; कोपरखेैरणे भागात विशेष लक्ष

विमानतळाचे काम थांबणार नाही
विमानतळाच्या परिसरात अनेक प्राण्यांचे अवशेष सापडत असल्याने विमानतळाच्या कामावर परिणाम होईल, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, आमच्या संशोधनामुळे विमानतळाचे काम थांबणार नाही; मात्र त्यांच्या कामावर थोडाफार परिणाम होईल, असे आयएनएएचने म्हटले आहे.