मुलांच्या झोपेसाठी शाळा उशिरा भरणार

मुलांच्या झोपेसाठी शाळा उशिरा भरणार

कॅलिफोर्निया : शाळा म्हटला की, प्रत्येकाच्या आठवणीतील एका कंटाळवानी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे. ब-यापैकी प्रत्येकालाच सकाळी उठण्याचा कंटाळा यायचा, त्यात सुरुवातीला न आवडते तास असले की अधिकच कंटाळा...

मात्र याच त्रासापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे राज्यपाल गॅविन न्यूजम यांनी शाळांच्या वेळेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार शाळा या 7 किंवा 7.30 एवजी न भरता 8.30 ला भरणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना लवकर यायचे असेल ते लवकर देखील येऊ शकणार आहेत. 

लहानमुलांच्या शरीरासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. मात्र ब-याच शाळा सकाळी लवकर सुरु होत असतात. त्यामुळे मुलांच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा विचार करत अमेरीकेतील कॅलिफोर्निया येथील शाळांच्या नियमात महत्वाचे बदल करत शाळा 8 नंतर सुरू करण्यात येणार आहेत. 

या नवीन बदलांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यास कायद्याने शाळांना तीन वर्षांची मुदत दिली आहे. हा नियम संपुर्ण राज्यातील शाळांमध्ये 1 जुलै, 2022 पर्यंत लागू होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com