अमेरिकेच्या नव्या प्रस्तावावर इराणने दिली 'ही' प्रतिक्रिया 

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

जून महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व इराण यांच्यात नवा करार होऊ शकत असल्याचा पुनरुच्चार केला होता. यावर आता इराणने प्रतिक्रिया देताना अमेरिकेशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे. 

तेहरान : इराणच्या अणुप्रक्रियेला आळा घालण्यासाठी केलेला करार अमेरिकेने एकतर्फी मोडल्यामुळे आणि इराणवर कठोर आर्थिक निर्बध घातल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध दुरावले होते. तसेच वर्षाच्या सुरवातीला अमेरिकेने ड्रोनद्वारे कारवाई करत इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांना ठार मारले होते. यानंतर इराण आणि अमेरिकेचे यांच्यातील वाद आणखीनच चिघळला होता. मात्र त्यानंतर इराणने अमेरिकन बंधक मायकेल व्हाईट याला सोडण्याचा घेतलेला निर्णय व अमेरिकेने मजीद तहरी यांना इराणला जाऊ देण्याच्या हालचालींना वेग दिला होता. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर जून महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व इराण यांच्यात नवा करार होऊ शकत असल्याचा पुनरुच्चार केला होता. यावर आता इराणने प्रतिक्रिया देताना अमेरिकेशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे. 

बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट मोहिमेचं चीनला मिरच्या झोंबल्या; वाचा चीनचा ग्लोबल टाईम्स काय म्हणतोय...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये इराणसोबत करण्यात आलेल्या २०१५ च्या आण्विक करारातून माघार घेत, इराणवर कठोर आर्थिक निर्बध लादले होते. त्यामुळे तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला होता. मात्र मागील मे महिन्यात इराणने अमेरिकन बंधक मायकेल व्हाईट याला सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर अमेरिकेने देखील मजीद तहरी यांना इराणला जाऊ देण्याच्या हालचालींना वेग दिला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या ट्विटर वर ट्विट करत, अमेरिकेच्या आगामी निवडणुकीची प्रतीक्षा न करता आपणच ही निवडणूक जिंकणार असल्याने अमेरिकेसोबत चांगला करार करण्यासंदर्भात पुढे येण्याचे निमंत्रण इराणला दिले होते.

'या' देशामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट 

त्यानंतर या महिन्याच्या सुरवातीला देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कठोर मर्यादा घालण्यासाठी, तसेच इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या कार्यक्रमाला आळा घालण्यासाठी आणि दशकभरापासून सुरु असलेल्या युद्धाचा अंत करण्याच्या उद्देशाने इराणसोबत नवीन करार करण्यासाठी अमेरिका तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज इराणने जोपर्यंत अमेरिका इराणवरील आर्थिक निर्बंध मागे घेत नाही आणि पूर्वीच्या मूळ कराराकडे परत येत नाही तोपर्यंत, अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेसोबत चर्चा करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हणत इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी तत्पूर्वी वॉशिंग्टनने २०१५ च्या अणू करारा अंतर्गत आपली जबाबदारी पार पाडत, दिलगिरी व्यक्त करावी आणि त्याबदल्यात भरपाई द्यावी, असे म्हटले आहे. यासोबतच हसन रुहानी यांनी, यूरोपीय देशांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरली असल्याचा आरोप केला आहे. 

 

 

               


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Iran reacts on new proposal given by US