
New York : सुपरमार्केटमध्ये गोळीबार, १० जण ठार; आरोपीने केला Live Video
न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये (New York Supermarket Firing) शनिवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १० जण ठार झाल्याची माहिती आहे. एका 18 वर्षीय तरुणाने गोळीबार केल्याचा आरोप आहे. ही घटना बफेलो शहरात घडली. वर्णभेदाचे हे प्रकरण असून एका गोऱ्या तरुणाने कृष्णवर्णीयांवर गोळीबार केला. इतकंच नाहीतर आरोपीने गोळीबाराचा लाईव्ह व्हिडिओ देखील केला.
हेही वाचा: हॉटेल कपिल गोळीबार प्रकरण: मुख्य आरोपीसह सात जणांना अटक
बफेलो शहराचे पोलिस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हेल्मेट घातलेल्या बंदूकधारी व्यक्तीने गजबजलेल्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये चार जणांवर गोळ्या झाडल्या, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. नंतर आत जाऊन गोळीबार केला. स्टोअरमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे, असंही आयुक्तांनी सांगितलं.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या बंदूकधारी व्यक्तीला अटक करण्यासाठी गोळीबार देखील केला. पण, त्याने लष्कराचा गणवेश घातला होता आणि बुलेटप्रूप जॅकेट देखील घातलं होतं. त्यामुळे त्याला अटक करण्यात अडचण येत होती. अखेर त्याला अटक करण्यात आली. पण, यावेळी त्याने पोलिसांवर देखील गोळीबार केला. त्याने एकूण १३ लोकांवर गोळीबार केला असून त्यापैकी ११ जण कृष्णवर्णीय आहेत, असंही ग्रामाग्लिया म्हणाले.
Web Title: 10 Died In Open Firing In Supermarket Buffalo New York
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..