अबब! सोन्याचा दर तब्बल 90 हजारांवर

वृत्तसंस्था
Tuesday, 7 January 2020

पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरमधील बाजारपेठेत सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 90 हजार 800 रुपये झाला आहे. शुक्रवारपासून सोन्याच्या दरात तब्बल 1150 रुपयांची वाढ झाली आहे.

इस्लामाबाद : महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या पाकिस्तानमध्ये आता सोन्याचे भाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण सोन्याचा प्रति तोळ्याचा दर तब्बल 90 हजार 800 रुपयांवर पोहचला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारात पडताना दिसत आहेत. भारतातही सोन्याने 41 हजारांचा दर गाठला आहे. आगोदरच पाकिस्तानी जनता पेट्रोल-डिझेल, भाजीपाला यांच्या दरांवरून त्रस्त असताना आता सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Exclusive : सोन्याचा दर 'वाढता वाढता वाढे'; दोन दिवसात 1800 रुपयांनी महागले!

पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरमधील बाजारपेठेत सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 90 हजार 800 रुपये झाला आहे. शुक्रवारपासून सोन्याच्या दरात तब्बल 1150 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर 23 हजार रुपयांनी वाढले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 gram gold price is 90800 rupees in Pakistan