Elon Musk: भारत दौरा पुढे ढकलणारे इलॉन मस्क अचानक चीनला रवाना, जाणून घ्या काय आहे कारण

Elon Musk China Tour: इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये सांगितले होते की, ते 2024 मध्ये भारताला भेट देण्याची योजना आखत आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदींनी मस्क यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले होते.
Elon Musk China Tour
Elon Musk China TourEsakal

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क रविवारी अचानक चीनला रवाना झाले आहेत. मस्क यांचा हा चीन दौरा महत्त्वाचा मानला जातो कारण चीन, इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

विशेष म्हणजे, मस्क यांनी आठवडाभरापूर्वी आपला नियोजित भारत दौरा पुढे ढकलला होता. भारत दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनांची घोषणा करणार असल्याचे बोलले जात होते. (Elon Musk China Tour)

आता असे म्हटले जात आहे की, टेस्लाचे सीईओ मस्क वरिष्ठ चीनी अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून ते फुल-सेल्फ ड्रायव्हिंग (FSD) सॉफ्टवेअरवर चर्चा करू शकतील. फुल सेल्फ ड्रायव्हिंगशी संबंधित गोळा केलेला डेटा अमेरिकेत हस्तांतरित करण्यासाठी चीनला तयार करण्याचाही प्रयत्न मस्क करतील.

टेस्लाने वर्षांपूर्वी त्यांच्या ऑटोपायलट सॉफ्टवेअरची सर्वात स्वायत्त आवृत्ती FSD लाँच केली, परंतु ग्राहकांच्या विनंतीनंतरही ती अद्याप चीनमध्ये उपलब्ध केले गेली नाही.

Elon Musk China Tour
Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका प्रश्नाला उत्तर देताना, मस्क म्हणाले की टेस्ला लवकरच चीनमधील ग्राहकांना FSD उपलब्ध करून देईल.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाने 2021 पासून शांघायमध्ये त्यांच्या चायनीज ताफ्याद्वारे संकलित केलेला सर्व डेटा चीनी नियामकांच्या आवश्यकतेनुसार संग्रहित केला आहे. पण तो अमेरिकेला परत पाठवलेला नाही.

Elon Musk China Tour
WhatsApp Account Blocked : 'या' कारणांमुळे ब्लॉक होऊ शकतं तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट; सोनू सूदलाही बसलाय फटका!

इलॉन मस्क या महिन्याच्या 21 आणि 22 तारखेला भारत दौऱ्यावर येणार होते आणि त्यांच्या दौऱ्याचे नियोजन खूप आधीपासून झाले होते. ते पंतप्रधान मोदींना नवी दिल्लीत भेटणार होते, ज्यामध्ये ते दक्षिण आशियाई बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनांची घोषणा करणार होते.

इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये सांगितले होते की, ते 2024 मध्ये भारताला भेट देण्याची योजना आखत आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदींनी मस्क यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com