चर्चिल ते ट्रस : ब्रिटनच्या 'या' 15 पंतप्रधानांची राणी Elizabeth II यांनी केली नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

15 pms appointed by queen elizabeth ii from winston churchill to liz truss check list here

चर्चिल ते ट्रस : ब्रिटनच्या 'या' 15 पंतप्रधानांची राणी Elizabeth II यांनी केली नियुक्ती

इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth ll) यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणूक निकालांमध्ये लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला. त्या राणी एलिझाबेथ II यांच्या कारकिर्दीत यूकेच्या 15व्या पंतप्रधान बनल्या आहेत.

लिझ ट्रस या 15व्या ब्रिटनच्या पंतप्रधान असतील ज्यांचा राणी एलिझाबेथ II यांच्या हस्ते नेमणूक मिळाली आहे, आज आपण राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कारकिर्दीत काम केलेल्या सर्व पंधरा माजी पंतप्रधानांबद्दल जाणून घेऊयात..

विन्स्टन चर्चिल (1951-55)

विन्स्टन चर्चिल हे यूकेचे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी 1951 ते 1955 या काळात राणी एलिझाबेथच्या अंतर्गत काम केले. दरम्यान पंतप्रधान म्हणून पहिल्या कार्यकाळात द्वितीय विश्वयुद्धातील ऐतिहासिक योगदानासाठी ते ओळखले जातात.

अँथनी इडन (1955-57))

अँथनी इडन यांनी एप्रिल 1955 मध्ये पुढील पंतप्रधानपद भूषवले. राणी एलिझाबेथच्या कारकिर्दीत दुसरे पंतप्रधान असताना त्यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात घट झाली. इजिप्त सरकारने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर, अँथनी एडन यांनी फ्रान्स आणि इस्रायलसह कालवा पुन्हा ताब्यात घेण्याचा कट रचला. या हल्ल्यानंतर पंतप्रधानांना इतर देश आणि संयुक्त राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. सततच्या टीकेमुळे त्यांना 1957 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.

हॅरोल्ड मॅकमिलन (1957-63)

अँथनी एडन यांच्या राजीनाम्यानंतर, हॅरोल्ड मॅकमिलन यांनी 1957 मध्ये युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यूकेला अशांततेच्या गर्तेतून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.

अॅलेक डग्लस-होम (1963-64)

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते, अॅलेक डग्लस यांनी 1963 ते 1964 या काळात अत्यंत कमी कालावधीसाठी पंतप्रधानपद भूषवले. त्यांनी केवळ 363 दिवस सेवा दिली.

हॅरोल्ड विल्सन (1964-70 आणि 1974-76)

पुढे लेबर पार्टीचे नेते हॅरोल्ड विल्सन यांनी राणी एलिझाबेथच्या कारकिर्दीत यूकेचे पाचवे पंतप्रधान बनले. 1974-1976 दरम्यान देखील ते पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने घटस्फोट, गर्भपात, समलैंगिकता आणि फाशीची शिक्षा रद्द करण्यासंबंधी काही महत्त्वाचे कायदे तयार केले.

एडवर्ड हीथ (1970-74)

एडवर्ड हीथ यांनी 1970 मध्ये यूकेमध्ये पुराणमतवादी पक्षाचे सरकार बनवले. त्यांचा कार्यकाळ प्रामुख्याने औद्योगिक आणि आर्थिक सुधारणा करण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखला जातो.

जेम्स कॅलाघन (1976-79)

जेम्स कॅलाघन यांनी देश प्रचंड महागाईने होरपळत असताना सरकार सांभाळले. तसेच त्यांनी देशातील वांशिक भेदभाव दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली.

हेही वाचा: Liz Truss : राणी एलिझाबेथ यांच्या भेटीनंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान

मार्गारेट थॅचर (1979-90)

'आयर्न लेडी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या बॅरोनेस मार्गारेट थॅचर या केवळ पहिल्या महिला ब्रिटीश पंतप्रधान नसून 11 वर्षांच्या कार्यकाळासह सर्वात जास्त काळ सेवा देणाऱ्या पंतप्रधान म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. देशांतर्गत अनेक सुधारणा करण्यासाठी त्यांना लक्षात ठेवले जाते.

जॉन मेजर (1990-97)

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते जॉन मेजर यांनी मार्गारेट थॅचरनंतर पुढील पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात ब्रिटनची अर्थव्यवस्था सातत्याने भरभराटीला आली.

टोनी ब्लेअर (1997-2007)

लेबर पार्टीचे टोनी ब्लेअर हे सर्वात जास्त काळ काम करणारे पंतप्रधान होते. 9/11 आणि 7/7 च्या दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी त्यांनी देशाचे नेतृत्व केले. देशात सार्वजनिक क्षेत्रातील काही प्रमुख सुधारणा घडवून आणण्यासाठीही ते जबाबदार होते.

गॉर्डन ब्राउन (2007-10)

टोनी ब्लेअर यांच्यानंतर पंतप्रधान पद गॉर्डन ब्राउन यांच्याकडे आले, त्यांच्या कार्यकाळातील काही प्रमुख घटनांमध्ये जगातील पहिल्या हवामान बदल कायद्याचा समावेश आहे जो हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ग्रहाला ग्लोबल वार्मिंगपासून वाचवण्यासाठी लागू करण्यात आला होता.

हेही वाचा: iPhone 14 : सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कशी काम करते? याचे भारतात भविष्य काय?

डेव्हिड कॅमेरून (2010-16)

त्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते डेव्हिड कॅमेरून यांनी देशात आघाडी सरकारचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या सरकारने ब्रिटनचा समलिंगी विवाह कायदाही मंजूर केला. त्यांच्या कार्यकाळात एकूण तीन जनमत चाचण्या घेण्यात आली. तिसऱ्या सर्वमत चाचणीमध्ये ब्रिटनच्या जनतेने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या बाजूने मतदान केले. त्याच्या देशव्यापी प्रो-EU मोहिमेनंतरही हे घडून आले. अखेर 2016 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.

थेरेसा मे (2016-2019)

पुढे सत्तेत आलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या, थेरेसा मे या यूकेच्या आणखी एका पंतप्रधान होत्या ज्यांनी पर्यावरण संवर्धन आणि ग्लोबल वार्मिंग कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली.

बोरिस जॉन्सन (2019-22)

2019 मध्ये थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. ब्रेक्झिट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी कोरोना लॉकडाऊन दरम्यान नियम तोडल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका झाली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलल्यानंतर त्यांच्या सरकारवर कर वाढवल्याची टीका झाली.

Web Title: 15 Pms Appointed By Queen Elizabeth Ii From Winston Churchill To Liz Truss Check List Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :queen elizabeth