iPhone 14 : सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कशी काम करते? याचे भारतात भविष्य काय?

iphone 14 satellite connectivity feature offers better network know it works
iphone 14 satellite connectivity feature offers better network know it works

Apple ने काल एका भव्य इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीने आयफोन 14 सीरीज अंतर्गत चार नवीन आयफोन लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये आयफोन 14, आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लॉन्च करण्यात आले आहेत. आयफोन 14 सीरीज ई-सिम सपोर्ट आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आली आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या इमर्जंसी कॉंटॅक्ट फीचरला समोपर्ट देण्यासाठी Apple ने ग्लोबलस्टारशी देखील भागीदारी केली आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने, वापरकर्ते सेल्युलर कव्हरेजशिवाय कॉल करू शकतात आणि संदेश पाठवू शकतात. आज आपण सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कशी काम करते आणि भारतात त्याचे भविष्य काय असेल याबद्दल जाणून घेणार आहोत..

सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी कशी काम करते?

सॅटेलाइट नेटवर्कद्वारे मोबाईल टॉवर नसले तरी स्मार्टफोनला थेट सॅटेलाइटद्वारे नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळते. या प्रक्रियेत, स्मार्टफोन लो-अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रहाशी संवाद साधतो आणि Find My अॅप वापरून आपत्कालीन सेवा प्रदात्यांना त्याचे लोकेशन शेअर करू शकतो किंवा कॉल-मेसेजद्वारे थेट संपर्क देखील करू शकतो. मात्र, उपग्रहाला संवाद साधण्यासाठी आणि सिग्नल प्राप्त करण्यासाठी एक ते दोन मिनिटे लागू शकतात. दुर्गम भागातील मोबाईल टॉवर्सवरून नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणे कठीण असताना सॅटेलाइट नेटवर्क खूप उपयुक्त ठरते. यामध्ये यूजर्स सेल्युलर नेटवर्कशिवायही सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने स्मार्टफोनवर कॉल आणि मेसेज करू शकतात.

म्हणजेच, फोनमधील नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, वापरकर्त्यांना मोबाइल टॉवरवरून नेटवर्कची चिंता करण्याची गरज नाही, त्याशिवाय वापरकर्ते कॉल आणि मेसेज करू शकतील. नवीन iPhone मध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पहिल्या दोन वर्षांसाठी मोफत उपलब्ध करून दिली जाईल. दोन वर्षांनंतर अॅपल यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करेल.

iphone 14 satellite connectivity feature offers better network know it works
iPhones 14 Launch : लॉंच होण्यापूर्वीच 'या' देशात iPhone वर बंदी, जाणून घ्या कारण

Apple ची Globalstar सोबत भागीदारी

सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या आपत्कालीन इमर्जंसी सॅटलाईट कॉन्टॅक्ट फीचर्सना सपोर्ट देण्यासाठी Apple ने Globalstar सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून, ग्लोबलस्टार आणि Apple ने $450 मिलीयनच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये Apple त्यांच्या नवीन सॅटलाईठ कनेक्टिव्हिटी फीचर्सना सपोर्ट देण्यासाठी ग्लोबलस्टारच्या एडव्हांस मॅन्युफॅक्चरींगचा वापर करेल. ग्लोबलस्टार लो-अर्थ ऑर्बिट उपग्रह तयार करतो आणि अलीकडेच ग्लोबलस्टारने टी-मोबाइल आणि स्पेसएक्सचे उपग्रह देखील घेतले आहेत.

Google आणि SpaceX च्या घोषणा..

याआधी गुगल आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनीही सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीबाबत एक स्टेटमेंट जारी केले होते. इलॉन मस्क यांनी सांगितले होते की ज्या भागात मोबाईल टॉवर काम करत नाहीत तेथेही स्पेसएक्स आपल्या सॅटेलाइट इंटरनेटद्वारे स्मार्टफोनमध्ये सिग्नल प्रसारित करेल. यानंतर, Google ने आगामी Android 14 मध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करण्याबद्दल माहिती दिली होती.

iphone 14 satellite connectivity feature offers better network know it works
iPhone 14 launched: जाणून घ्या हटके फिचर्स

भारतात सॅटलाईट कनेक्टिव्हिटी..

भारतात, एक सामान्य माणूस सॅटेलाइट फोन खरेदी करू शकतो, परंतु त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक आहे. थुराया/इरिडियम सॅटेलाइट फोनचा वापर भारतीय वायरलेस कायद्याच्या कलम 6 आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम 20 अंतर्गत भारतात प्रतिबंधित आहे. भारतात येणार्‍या पर्यटकांना सॅटेलाइट फोन वापरण्यासाठी परवानगी आणि परवाना घेणे देखील आवश्यक आहे. म्हणजेच भारतात सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर वापरणे सोपे जाणार नाही. सध्या तरी भारतात या फीचरसाठी युजर्सना बरीच प्रतीक्षा करावी लागू शकते. Apple सध्या फक्त अमेरिका आणि कॅनडासाठी ही सेवा सुरू करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com