
मारियुपोल सीटी : रशियानं युक्रेनवर आक्रमण (Russia Ukraine crisis) केल्यानंतर पंधरादिवसांहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. या युद्धात आत्तापर्यंत युक्रेनचे हजारो निरपराध नागरिक मारले गेले आहेत. बॉम्ब हल्ल्यांमुळं उद्ध्वस्त झालेल्या इमारती, सार्वजनिक ठिकाणांची विदिर्ण अवस्था अनेक व्हिडिओ आणि फोटोंमधून समोर आली आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मृत नागरिकांच्या मृतदेहांचं सामुहिक दफन करण्यात येत आहे. (1582 civilians dead in 12 days Bodies being buried in mass graves in Ukraine)
युक्रेनमधील मारियुपोल इथं गेल्या बारा दिवसांत रशियन सैन्यानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये १,५८२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतदेहांचं दफन करण्यासाठी एक चारी खोदण्यात आली असून यामध्ये हे मृतदेह एकामागे एक ठेवून त्यांचं दफन करण्यात येत आहे. हे काम करत असलेला एक सामाजिक कार्यकर्ता वोलोदिमिर बायकोव्हस्की यांनी म्हटलं की, "या युद्धामध्ये कोण दोषी कोण योग्य हे मला माहिती नाही. हे कुणी सुरु केलं हे मला माहिती नाही पण हे आता थांबायला हवं"
"रशियन सैन्यानं वेढा दिलेल्या मारियुपोल शहरातील आपत्ती ही पृथ्वीवरील मानवतेविरोधातील सर्वांत वाईट आपत्ती आहे. यामध्ये बारा दिवसात १५८२ मृत्यू पावलेल्या नागरिकांचं सामुहिक दफन करण्यात आलं. युक्रेनियन सैन्याला पराभूत करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन हे दुबळ्या आणि निशस्त्र नागरिकांवर बॉम्बफेक करत आहेत आणि मानवतावादी मदत रोखत आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी आम्हाला विमानांची गरज आहे" असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
मारियुपोलमध्ये लाईट-पाणी बंद
मारियुपोल शहराची सध्या लाईट-पाणी बंद झालं आहे. रशियन सैन्याच्या हल्ल्यात इथल्या इमारती, घरं, रुग्णालयं आणि रस्ते उद्ध्वस्त झाली आहेत. या अभुतपूर्व स्थितीवर भाष्य करताना युक्रेनमधील एका शेतकऱ्यानं म्हटलं की, "युद्धामुळं कृषी उत्पादन आणि दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. आमच्याकडे बियाणांची, इंधनाची आणि खतांची कमतरता आहे, सर्व रस्ते बंद झाले आहेत"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.