Afghanistan: भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, 90 पेक्षा अधिक जखमी

वृत्तसंस्था
Sunday, 18 October 2020

अफगाणिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे.

फिरोज कोह- अफगाणिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या पश्चिमी गोर प्रांताची राजधानी फिरोज कोह येथे झालेल्या या भीषण स्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 90 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. 

स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटके एका मिनीबसमध्ये ठेवण्यात आली होती. पोलिस कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालय असणाऱ्या भागात ही बस उभी करण्यात आली होती. स्फोटाचा प्रकार पाहून हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. सुरक्षा दल घटना स्थळी पोहोचले असून जागेची तपासणी केली जात आहे. तसेच बचावकार्य सुरु आहे.

पार्सल मिळालं नाही म्हणून, थेट ऍमेझॉनच्या मालकाला केला मेल

स्फोटामुळे घटनास्थळी गोंधळ माजला होता. अधिकाऱ्यांकडून मृतांची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात. अजून तरी कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 killed 90 wounded in explosion in  Ghor Afghanistan