
चीनच्या नॉर्थ इस्टला असलेल्या पर्वत रांगेत एक १८ वर्षांचा मुलगा १० दिवस बेपत्ता होता. या दहा दिवसात बर्फामुळे पडलेल्या कडाक्याच्या थंडीत खाद्यपदार्थही त्याच्याकडे नव्हते. नदीचं बर्फाळ पाणी पिऊन त्यानं दहा दिवस काढले. या दहा दिवसात खायचं सामना संपल्यानंतर तो टूथपेस्ट खाऊन जिवंत राहिला. सन लियांग असं मुलाचं नाव असून ८ फेब्रुवारीला तो एकटा हायकिंसाठी गेला होता.