'दहशतवादावर आंतरराष्ट्रीय करार व्हावा'

18th Summit of the Non-Aligned Movement (NAM) in Azerbaijan
18th Summit of the Non-Aligned Movement (NAM) in Azerbaijan

बाकू (अझरबैजान) - ‘दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर तपासयंत्रणांच्या परस्पर सहकार्याचा आणि माहितीच्या आदानप्रदानाचा व्यापक आंतरराष्ट्रीय करार (सीसीआयटी-कॉम्प्रिहेन्सीव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररीझम) करावा,’ अशा शब्दांत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज अलिप्त राष्ट्र चळवळीच्या (नाम) राष्ट्रप्रमुख परिषदेच्या व्यासपीठावर या समस्येकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. तसेच जम्मू-काश्‍मीरचा मुद्दा या व्यासपीठावर उपस्थित करण्यावरून नायडूंनी पाकिस्तानलाही जोरदार फटकारले. 

‘नाम’च्या राष्ट्रप्रमुखांची १८ वी परिषद अझरबैजानची राजधानी बाकू येथे आजपासून सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना नायडू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या स्थापनावर्षात सुरक्षा परिषदेचा विस्तार आणि भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याचाही आग्रही पुनरुच्चार केला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या अलिप्त राष्ट्र चळवळीच्या राष्ट्रप्रमुखांच्या १७ व्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले नव्हते. यंदा ही जबाबदारी उपराष्ट्रपती पार पाडत आहेत. 

विशेष विमानाने नायडूंचे काल येथे आगमन झाले. आज राष्ट्रप्रमुख बैठकीत त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताच्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. 

मलेशियाचा सावध पवित्रा 
भारताने जम्मू-काश्‍मीरचे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानची उघड पाठराखण करून भारताला डिवचणारे मलेशियाचे पंतप्रधान महातीर महंमद यांनी या परिषदेत मात्र नरमाईचा पवित्रा घेतला. जम्मू-काश्‍मीर अथवा भारताचा कोणताही उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले. दहशतवादाच्या समस्येच्या मूळ कारणांशी जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com