Indonesia Food Oil News | खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल्या रांगा, दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia Food Oil

खाद्यतेल खरेदीसाठी इंडोनेशियात लागल्या रांगा, दोघांचा मृत्यू ...

इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल (food oil ) उत्पादक देश आहे. पण इथेच खाद्यतेल टंचाई असल्याने खाद्यतेल विकत घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. याच रांगात उभ्या असलेल्या दोन इंडोनेशियन (Indonesia) नागरिकांचा मृत्यू झालाय. बोर्निओ बेटावरील ईस्ट-कॅलिमॅंन्टन याठीकाणी ही घटना घडली. आश्चर्य म्हणजे इंडोनेशियातील सर्वाधिक पामतेल उत्पादन बोर्निओ बेटावरच्या याच भागात होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफुल तेल, सोयाबीन तेलाबरोबरच पाम तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली. तसचं युद्धामुळे खाद्यतेल आयात घटल्याचं सॉल्व्हेट एक्सट्र्याक्टर्स असोसिएशनने म्हंटलय. भारतात एकुण मागणीच्या ६५ टक्के खाद्यतेल आयात करावी लागते.(Indonesia food oil scarcity)

हेही वाचा: खाद्यतेल २५ रुपयांनी महाग; युक्रेन-रशिया संघर्षामुळे तेलबियांच्या आयातीवर परिणाम

इंडोनेशियातून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल निर्यात होते. मात्र आता इंडोनेशियाने ३० टक्के पामतेल देशातच विकणे बंधणकारक केलंय. तसंच इंडोनेशिया सरकारने प्रत्येक व्यक्तीला दोन लिटरचं खाद्यतेल खरेदीचा नियम केलाय. त्यामुळे अनेकजण खाद्यतेल साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

Web Title: 2 Died In Indonesia While Standing In Que For Purchasing Food Oil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top