लोकांना चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी बांगलादेशमध्ये असे सुरु आहेत प्रयत्न

bangladesh, cyclone, amphan
bangladesh, cyclone, amphan
Updated on

ढाका : जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं असताना बांगलादेशमध्ये आणखी एका संकटातून वाचण्याची पळापळ सुरु झाली आहे. अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये जवळपास 20 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्राकृतिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सरकारने प्रभावित भागात लष्करी जवानांना तैनात केले आहे. 

धक्कादायक : चीनच्या राजदूतांचा इस्त्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही जिल्ह्यांमध्ये 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळाचा प्रवास हा देशाच्या समुद्रकिनाऱ्याला धडकण्याच्या दिशेने सुरु आहे. 2007 मध्ये बांगलादेशमध्ये आलेल्या सिद्र चक्रीवादळापेक्षा अधिक तीव्रतेने या चक्रीवादळाचा फटका बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सिद्र चक्रीवादळाच्या घटनेवेळी 3,500 लोकांनी आपला जीव गमावला होता. राष्ट्रीय आपतकालीन प्रतिबंध परिषदेच्या बैठकीनंतर शेख हसीना म्हणाल्या की, अम्फान चक्रीवादळाच्या संकटकालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टिने योग्य ती पावले उचलली जात आहेत. या चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चक्रीवादळाच्या संकटापूर्वी 20 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी बांगलादेशचे लष्कर सज्ज झाले आहे. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स आपापल्या स्तरावर मदतीसाठी तयार आहेत.   

चक्रीवादळ बांगलादेश किनाऱ्यापासून जवळपास 400 किमी दूर आहे. 2007 च्या चक्रीवादळापेक्षा याची तीव्रता अधिक असल्यामुळे बांगलादेशमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते.  स्थानिक प्रसारमाध्यमांना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य प्रभावित क्षेत्रातील रहिवाशांना घरे खाली करण्यास सांगण्यात आले होते. चक्रीवादळाची तीव्रता आणि धोका यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर लोक घरे सोडण्यास तयार झाली. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. लष्कराकडून 71 वैद्यकीय टीमसह 145 आपतकालीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. हवाईदलाच्या ताफ्यातून 22 हेलिकॉप्टप आणि 6 विमाने संकटजन्य परिस्थितीत मदतीसाठी सज्ज असतील. याशिवाय नौदलाने 25 नौकाही तयार आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com