रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एँड्रिया घेज यांना भौतिक शास्त्रातील नोबेल

physics nobel.jpg
physics nobel.jpg

नवी दिल्ली- भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार अमेरिकेचे रॉजर पेनरोज (Roger Penrose), रेनहार्ड गेंजेल (Reinhard Genzel) आणि एँड्रिया घेज (Andrea Ghez) यांना कृष्ण विवराच्या शोधासाठी संयुक्तरित्या देण्यात आला आहे. 

'द नोबेल प्राइज' टि्वटर हँडलने दिलेल्या माहितीनुसार, रॉयल स्वीडिश अकँडमी ऑफ सायन्सेसने भौतिक शास्त्रातील पुरस्कार रॉजर पेनरोझ, रेनहार्ड गेंजेल आणि एँड्रिया घेज यांना संयुक्तरित्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मागील काही वर्षांपासून भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार संबंधित विषयावर काम करणाऱ्या एकाहून अधिक जणांना दिला जात आहे. ब्रह्मांडातील रहस्य प्रकाशात आणण्यात सैद्धांतिक कार्य करणारे जेम्स पीबल्स, सौरमंडलच्या बाहेर एका ग्रहाचा शोध करणारे स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ मायकल मेयर आणि डिडियर कुलोज यांना मागील वर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 

तत्पूर्वी, सोमवारी (दि.5) 2020 सालचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार Nobel Medicine Prize जाहीर करण्यात आला. हार्वे जे अल्टर (Harvey Alter), माईकल ह्यूटन (Michael Houghton) आणि चार्ल्स एम राईस (Charles Rice) या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

'हिपेटाइटिस सी व्हायरस'च्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रक्तामधील हेपेटाइटिस, जगभरात सिरोसिस आणि यकृतच्या कँसरसाठी कारणीभूत ठरतो. याविरोधात लढण्यासाठी या तिघांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com