
Video : '२०२४, मोदी वन्स मोअर', जर्मनीत भारतीयांकडून घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसीय युरोप दौऱ्याचा एक भाग म्हणून जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले आहेत. येथे त्यांनी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. नंतर दोन्ही नेते बर्लिन येथे भारत-जर्मनी IGC बैठकीत सहभागी झाले. तत्पूर्वी, भारतीय समुदायाने त्यांचे जंगी स्वागत केले.
आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले, माझं भाग्य आहे की मला जर्मनीमध्ये 'मा भारती'च्या मुलांना भेटण्याची संधी मिळाली. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. तुमच्यापैकी बरेच जण जर्मनीतील वेगवेगळ्या शहरांमधून इथे बर्लिनला आले आहेत.
आपल्या भाषणादरम्यान बोलताना मोदी म्हणाले की, आजच्या भारताला देशाची प्रगती हवी आहे, ते म्हणाले की, जेव्हा मी करोडो भारतीयांबद्दल बोलतो, तेव्हा त्यात फक्त तिथे राहणारे लोकच नाहीत तर इथे राहणाऱ्यांचाही समावेश होतो.
दरम्यान भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बर्लिनमधील भारतीय समुदायाचे नागरीक '२०२४, मोदी वन्स मोअर' असा जयघोष करताना दिसत आहेत. त्यामुळे बर्लिन, जर्मनी येथे भारतीय समुदायाला संबोधीत करण्याधी "२०२४, मोदी वन्स मोअर" अशा घोषणानी सभागृह दणाणून गेले.
हेही वाचा: मनसेची उद्या शिवतीर्थावर महत्वाची बैठक; भोंग्यांबाबत भूमिका ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी जर्मनीच्या चांसलरशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींना जर्मनीनंतर फ्रान्स आणि आणि डेन्मार्कला भेट देणार आहेत. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यावर जर्मनीला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीत राहणाऱ्या भारतीयांना संबोधित केले.
पंतप्रधान मोदी यांच्या जर्मनी भेटदरम्यान दोन्ही देशांनी शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक करारांवर स्वाक्षरी केल्या, ज्या अंतर्गत भारताला स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी 2030 पर्यंत 10.5 अब्ज डॉलरची मदत मिळणार आहे.
हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Web Title: 2024 Modi Once More Chants Pm Modi Germany Visit Indian In Berlin Watch Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..